२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 177

_ महाड सत्याग्रह परिषद १३५

जेव्हा परिषदेस सुरुवात झाली तेव्हा त्यांनी खालील ठराव सभेपुढे मांडला :

ठराव.-जे स्पृश्य हिंदू लोक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्य लोकास घेऊ देत नाहीत त्यांच्याविरूद्ध सत्याग्रह करण्याकरिता ही सभा बोलावण्यात आली असता, त्याच स्पृश्य हिंदूंनी सरकारची पाठ फिरुन आयत्या वेळी दिवाणी कोर्टाचा तात्पुरता मनाई हुकूम अस्पृश्य वर्गाच्या विरुद्ध मिळविल्यामुळे या सभेस सरकारविरूद्ध सत्याग्रह करण्याचा प्रसंग आणला ही गोष्ट ध्यानात घेऊन आणि मे. कलेक्टर साहेबांनी आपल्या भाषणात या बाबतीत सरकारचा दुराग्रह नसून, समान हक्कांकरिता अस्पृश्यांनी चालविलेल्या झगड्यात त्याला सरकारची पूर्ण सहानुभूती आहे असे भर सभेत दिलेले आश्वासन याचा विचार करून ही परिषद दिवाणी दाव्याचा निकाल होईपर्यंत सत्याग्रह तहकूब करीत आहे.

ठराव मांडताना डॉ. आंबेडकर म्हणाले,

`“ सत्याग्रह करा असा ठराव काल मी मांडला आणि सत्याग्रह तूर्त करू नका असा ठराव आज मीच मांडीत आहे हे पाहून आपल्याला मी चंचल वृत्तीचा माणूस आहे असे वाटेल. पण तसे काही नाही. दोनही गोष्टी पूर्ण विचारांतीच मी करीत आहे. काल आपल्यात निश्चय किती आहे याचा मला अंदाज पाहावयाचा होता. तो अंदाज मिळाला. आपला पूर्ण निश्चय असल्याबद्दल आता कोणालाही शंका उरली नाही. इतक्याने माझे समाधान झाले आहे. आपल्यात निश्चयाचे बळ नव्हते हीच आपल्यातील मोठी उणीव होती. ती उणीव तुम्ही भरून काढली आहे. आपण सत्याग्रह करु नये असे जे मी आपणास सांग: आहे ते देखील मी पूर्ण विचारांतीच सांगत आहे. शक्ती अंगात आली म्हणून तिचा उपयोग लगेच केला पाहिजे अशातला काही भाग नाहीं. शक्तीचा उपयोग करणे तो काळ वेळ पाहून करणे प्राप्त आहे. विचारांती मलाही पटले आहे की,

आज या शक्तीचा आपण उपयोग करू नये. आज सत्याग्रह केला तर, तो

सरकारविरूद्ध होणार आहे. सरकारचा दुराग्रह असेल तर सरकारविरूद्धही सत्याग्रह करावयाला हरकत नाही. पण सरकारचा दुराग्रह आहे का ? याचा विचार करां. सरकारची आपल्याला [सहानुभूती ] [आहे. ] मग विनाकारण सरकारला पेचात का टाकावे ? दुसरे असे की, आपल्या [सत्याग्रहाला ] [स्पृश्य ] लोकांची मुळीच सहानुभूती नाही, हे [तुम्ही ] [पाहात ] [आहा. ] स्पृश्य लोक सर्वस्वी आपल्याशी असहकारिता करीत आहेत. व्यापारी लोकांनी बाजार बंद केला आहे, खोतांनी शेती काढून घेण्याचा [सपाटा ] [लावला ] [आहे ] [व ] [कुणबी ] [लोकांनी ] [गुरे ]