डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे १३६
जोर आपल्याला कोंडवाड्यात घालण्याचे सत्र सुरू केले आहे. या जुलूमातून
जाण्यास सहाय्य निभावून जावयाचे आहे. तशाप्रकारे निभावून सरकारचे अवश्य आहे. ते मिळविण्याचे आश्वासन सरकार देत असताना आम्ही सरकारविरूद्ध सत्याग्रह करणे अनुचित आहे असे जर काही लोक म्हणाले तर ते वावगे आहे असे कोणाला म्हणता येणार नाही. तेव्हा तुम्ही या प्रसंगी, माझे ऐका आणि या ठरावास संमती द्या. तुम्हाला लोक हसू शकत नाहीत. खुद्द कलेक्टर साहेब तुमची विनवणी करीत आहेत, तेव्हा तुम्ही भ्याड म्हणून सत्याग्रह तहकूब करीत आहात असे कोणीही म्हणू शकणार नाही, फार तर तुमच्या पुढाऱ्यांनी माघार घेतली म्हणून हिणवतील. पण त्यांची खंती वाटावयाला नको. मला तरी वाटत नाही. कारण मी माघार घेतो ती तुमच्या हिताकरिताच. माझे अनुयायी माझ्यापुढे चार पावले गेले ही मोठ्या आनंदाची, नव्हे अभिमानाची गोष्ट आहे, असे मी समजतो. आज हा सत्याग्रह तहकूब करा असे जरी मी म्हणतो तरी तळे काबीज केल्याशिवाय राहू नये हा जसा तुमचा निश्चय आहे तसा माझा पण आहे. तो तडीस नेल्याखेरीज मी स्वस्थ बसणार नाही हे पक्के ध्यानात असू द्या. ”
वरील प्रकारचे भाषण ऐकून सत्याग्रह मंडळी फार निराश झाली. तरी पण सगळ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सांगण्यास मान देऊन, त्यांच्या ठरावास
मुकाट्याने रुकार दिला. |
प्रतिनिधींची प्रचंड मिरवणूक
नंतर जमलेल्या प्रतिनिधींची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत प्रथमारंभी मुंबहून आलेले. ५० व्हालंटियर होते. त्यानंतर सभेस आलेल्या ५० स्त्रिया होत्या. त्यानंतर एकापाठी एक चार-चारांच्या रांगेत सगळे प्रतिनिधी चालले होते. मधून मधून अंतरावर ब्रीदवाक्ये लिहिलेल्या पताका धरलेले लोक होते. गेल्या मार्च महिन्यात अस्पृश्य लोकांनी तळे भ्रष्ट केले म्हणून महाडातील स्पृश्य लोक सारे धर्मवीर बनले होते व नंगा नाच करून तुरुंगात गेले. आता
तर कोर्टाचा मनाई हुकूम मिळविला असल्यामुळे त्यांनी तर छाती काढून चालावयास पाहिजे होते. परंतु सर्वांनी दारे लावून घेतलेली ! बायकापोरे तर काय पण पुरुषसुद्धा रस्त्यावर फिरावयाचे बंद झाले होते! पुढारी लोक तर जीव घेऊन गाव सोडून पळून गेले होते! एकजण गावात असेल तर हराम! कोर्टाचा मनाई हुकूम सुटला असल्यामुळे सरकार घडीपुरते त्यांच्या बाजूचे असता महाडची प्रजा इतकी दीनवाणी कशी झाली, याचे सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. सिंहाचे छावे सगळी मांजराची पिल्ली कशी झाली हे एक कोडे होते. आधीच घाबरून