समितीचे नवनियुक्त सदस्य सचिव श्री. हरी नरके यांनी एप्रिलपासून युद्धपातळीवर या कामाला प्रारंभ करून गेली अनेक वर्षे काही अपरिहार्य कारणांमुळे प्रकाशित न होऊ शकलेले मराठी भाषांतराचे खंड येत्या काही महिन्यांत वाचकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. तसेच मराठीतील खंड अठरावाही वाचकांना त्वरित उपलब्ध करून देणे शक्य झाले. आम्ही समितीच्या मे पासून दरमहा बैठका घेऊन कामाला गती दिली आहे. समितीचे सर्व सदस्य, विशेषतः खासदार रा. सु. गवई, आमदार जोगेंद्र कवाडे, माजी आमदार टी. एम. कांबळे, प्रा. गंगाधर पानतावणे, प्रा. यशवंत मनोहर, प्रा. केशव मेश्राम, प्रा. अशोक गोडघाटे, प्रा. म. ल. कासारे, श्री. एन. जी. कांबळे आदींनी या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी दिलेले सहकार्य मोलाचे आहे.
प्रा. गंगाधर पानतावणे यांनी ग्रंथसूची बनवून दिली. अतिथी संपादक म्हणून प्रा. गोडघाटे, प्रा. कासारे व श्री. कांबळे या त्रयींनी अपार मेहनत घेऊन ह्या ग्रंथाचे साक्षेपी संपादन केले. ग्रंथाचे संपादक श्री. वसंत मून व श्री. हरी नरके आणि अतिथी संपादक प्रा. अशोक गोडघाटे, प्रा. म. ल. कासारे, श्री. एन. जी. कांबळे यांचे अभिनंदन !
one वेळसे-पाटील)
मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण
महाराष्ट्र राज्य.
(चौदा)