अस्पृश्योन्नती . . . . . जबाबदारी १४३
इतक्या मांभीर्यप्रचुर पद्धतीने पार पाडण्यात आला की, त्यामुळे सर्व सभाजनास आपल्या कर्तव्याची जाणीव धगधगीतपणे डोळयापुढे उभी राहिली. या कार्यक्रमापैकी पहिला .कार्यक्रम म्हणजे स्त्रीवर्गास व्याख्यान हा होय. दुपारी ठरल्याप्रमाणे सर्व स्त्रिया भाडभीड सोडून सभामंडपात येऊन बसल्या होत्या. त्यांच्यासाठी बसण्याकरिता मध्येच जागा राखून ठेवण्यात आली होती. त्यांना उद्देशून डॉ. आंबेडकर. म्हणाले
- आपण या सभेत आल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. घरप्रपंचाच्या अडचणी ज्याप्रमाणे स्त्री व पुरुष मिळून सोडवितात त्याप्रमाणे समाजाच्या संसारातील अडचणी स्त्रीपुरुषांनी मिळून सोडवावयास पाहिजे आहेत. पुरुषांनीच हे काम अंगावर घेतले तर ते पार पाडण्यास त्यांना पुष्कळ अवधी लागेल याबद्दल शंका नाही. तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतले तर त्या त्या कामात लवकर यशप्राप्ती करून घेतील असे माझे मत आहे. परंतु त्यांना एकट्याने जरी हे काम अंगावरती घेता आले नाही तरी जो पुरुषवर्ग हे काम करीत आहे त्याच्याशी सहकार्य केल्याशिवाय राहू नये. यासाठी तुम्ही यापुढे नेहमी परिषदेस हजर राहिले पाहिजे, असे माझे तुम्हास सांगणे आहे. खरे म्हटले असता, अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न पुरूषांचा नसून तुम्हा स्त्रियांचाच आहे. . तुम्ही आम्हा पुरुषांना जन्म दिलेला आहे. आम्हाला इतर लोक कसे जनावरांपेक्षाही कमी लेखतात, हे तुम्हास ठाऊक आहे. काही ठिकाणी आमची सावलीसुद्धा घेत नाहीत. इतर लोकास कोर्टकचेऱ्यांमध्ये मानासन्मानाच्या जागा मिळतात. परंतु तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलांना पोलीस खात्यातील शिपुर्ड्याचीही नोकरी मिळत नाही इतका आमचा हीन दर्जा आहे. हे सर्व तुम्हास ठाऊक असताना तुम्ही आम्हास जन्मास का घातले असा प्रश्न तुम्हास कोणी केला तर त्याचे उत्तर तुम्ही काय देऊ शकाल ? या सभेत बसलेल्या कायस्थ व इतर स्पृश्य बायांच्या पोटी जन्मलेल्या मुलात व तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलात काय अंतर आहे ? तुम्ही विचार करावयास पाहिजे की ब्राह्मणांच्या स्त्रियात जेवढे शील आहे तेवढे शील तुमच्यातही आहे. ब्राह्मण स्त्रियात जितके पातिव्रत्य आहे तितके पातिव्रत्य तुमच्यातही आहे आणि तुमच्यात जितके मनोधैर्य, करारीपणा व धमक आहे तितकी ब्राह्मण स्त्रियातदेखील नाही. असे असताना ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेले बालक का सर्वमान्य व्हावे व तुमच्या पोटी जन्मलेले बालक सर्व ठिकाणी का अवमानिले जावे, त्याला साध्या माणुसकीचा हक्क का असू नये, याचा कधी तुम्ही विचार केला आहे काय ? मला वाटते तुम्ही त्याचा मुळीच विचार केला नाही. तुम्ही जर विचार केला असता तर पुरुषांच्या आधी तुंम्ही स्त्रियांनी सत्याग्रह केला असता. कारण तुमच्या पोटी जन्म घेतला येवढेच पातक