बदललेल्या परिस्थितीची जाणीव ठेवा १४७
बदललेल्या परिस्थितीत आपल्या जातीला कोणते नियम लागू करणे योग्य आहेत याचा विचार करण्याकरिता, मी सर्व म्हेत्रे लोकांची सभा बोलावणार आहे. त्या सभेत जे नियम सर्वानुमते पास होतील ते अंमलात आणण्याची दक्षता तुम्ही घ्याल अशी मला आशा आहे.
त्यानंतर रा. शिवतरकर यांनी सभेपुढे शेवटचा ठराव मांडला. त्या ठरावात सत्याग्रह कमिटीच्यावतीने मुंबई इलाख्यातील मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व जिल्ह्यांतून महाडच्या सत्याग्रहाकरिता जे प्रतिनिधी आले होते त्यांचे आभार मानण्यात आले होते. महाडच्या परिषदेसंबंधाने ज्या काही अपूर्व गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्यापैकी सांगण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे महाडच्या चवदार तळ्याचा प्रश्न केवळ. कुलाबा जिल्ह्यातील लोकांपुरता आहे असे न मानता तो सर्व अस्पृश्य वर्गाचा आहे असे मानण्यात आले ही होय. मराठी बोलणाऱ्या जिल्ह्यांपैकी असा एकही जिल्हा नव्हता की, ज्या जिल्ह्यातून महाडच्या सत्याग्रहाकरिता लोक आले नव्हते. अशी जुट व एकी हरेक वेळी अस्पृष्य लोकांनी दाखविली तर, अस्पृश्यता निवारण्याचे काम फारच सुलभ होणार आहे. वरीलप्रकारचे रा. शिवतरकर यांचे भाषण झाल्यानंतर व रा. संभाजी _ गायकवाड यांनी दुजोरा दिल्यानंतर ठराव टाळ्यांच्या गजरात पास झाला व रात्री दीड वाजता सभेचे काम संपले.
वि (वाय) ४०९-१३-अ