२३-३-१९२९ आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही - Page 201

आपले हक्क प्रस्थापित . . . . . गत्यंतर नाही १५९

मत आहे की. सरकारने त्यांना उदारपणे जादा रकमा ग्रँट म्हणून देऊन अशा जमीनीची डागडूजी करून मशागत करण्यास उत्तेजन द्यावे आणि सरकारी नोकच्यात अस्पृश्यवर्गीय उमेदवारांचा भरणा करणेची सरकारने उदारपणाने तरतूद करावी.

(ब) अस्पृश्य वर्गातील साक्षरतेचे प्रमाण इतर समाजातील साक्षरतेचे प्रमाणाबरोबर येईपर्यंत अस्पृश्य वर्गातील विद्यार्थ्यांकरिता दरेक जिल्ह्यात १०० मुलांचे बोडींग काढावे.

ठराव ५ वा

रा. सा. पापण्णा यांचा मुलगा नारायण यांच्या मृत्यूबद्दल ही सभा दु:ख प्रदर्शित करते. ईश्वर मृताच्या आत्म्यास शांती देवो अशी सभेची ईश्वरास प्रार्थना आहे.

ठराव ६ वा

चांभारांच्या धंद्याची स्थिती अत्यंत हलाखीची झाली असल्यामुळे त्यांचे धंदे- शिक्षणाचे वर्ग काढावे व त्या समाजातील लोकांनी सहकारितेच्या तत्त्वावर चालविलेल्या संस्थांना, सरकारांनी सढळ हाताने मदत करावी आणि त्यांच्यातील लायक विद्यार्थ्यांस सरकारी खर्चाने त्यांच्या धंद्याचे शिक्षण घेण्याकरिता परदेशी पाठवावे असे या परिषदेचे मत आहे

ठराव७वा

(अ) मुलाचे वय वीस वर्षांचे असल्याशिवाय व मुलीचे वय १६ असल्याशिवाय त्यांची लग्ने करू नयेत.

(ब) कोणत्याही जातीतील, वर्गातील व समाजातील स्त्री पुरुषास मिश्र विवाह करण्याची 'पूर्ण मोकळीक असावी

(क) लग्न किंवा इतर उत्सव यात अस्पृश्य वर्गानी [शक्‍य ] तितका [पैसा ] [व ] [वेळ ] कमी खर्च करावा तसेच सर्व लग्नविधीत एक जेवणापलीकडे अधिक [पैसा ] [खर्च ] करू नये आणि उरलेल्या पैशाचा विनियोग आपल्या मुलामुलींच्या शिक्षणाकडे करावा

ठराव ८ वा

ज्या हॉटेलमध्ये व खाणावळीत अस्पृश्य वर्गास मज्जाव करण्यात येतो अशी हॉटेले व खाणावळी सुरू करण्यास सरकारने परवानगी देऊ नये, तसेच रेल्वेच्या ताब्यात असलेली हॉटेले व खाणावळी यामध्ये अस्पृश्य वर्गाना समतेने वागविण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा.