गुलामगिरीच्या पद्धती ...... मूठमाती द्या १६१
एकमताने पास केलेला संदेश सर्वाना पूर्णपणे बंधनकारक आहे. हा संदेश असा आहे की, आजच्या प्रसंगी आपण काय करीत आहोत व कशा करिता जमलो आहोत, आजच्या संदेशाची जबाबदारी काय आहे याचा विचार करणे जरूर आहे. अखिल हिंदू समाजाने ज्या वंशपरंपरेने काही गलिच्छ चालीरिती आपल्या समाजावर लादल्या आहेत त्या झुगारून देणे हाच आजच्या संदेशाचा मुख्य उद्देश आहे. एकंदर दृष्टीने विचार करता माझा संदेश फार महत्त्वाचा आहे. हिंदुस्थान देशामध्ये अत्यंत घाणेरडी अशी जी कामे आहेत ती ज्यांची त्यांनी न करता व ती व्यक्तिमात्रांच्या खुषीवर न ठेवता जी आपल्या अस्पृश्य समाजावर सक्तीने लादण्यात आली आहे त्या सक्तीला माझा विरोध आहे. आजच्या परिस्थितीत हीनत्वाचा ठसा एखादी व्यक्ती कितीही उच्च दर्जाला चढली तरी निघून जात नाही. हीनत्वाची भावना हाडीमासी भिनली आहे तोपर्यंत स्वाभिमान जागृत होणार नाही. ' जन्माप्रमाणे वागणे हाच तुझा धर्म पाळ ' अशी शिकवण चांभार, भंगी, महार, मांगादि अस्पृश्यांना दिली जात आहे. अशा परिस्थितीत ह्या समाजात मोठा कर्तृत्ववान पुरुष निर्माण होणे अशक्य आहे. ब्राह्मण वगैरे स्पृश्य जातीत जन्मलेली मुले मुन्सफ, मामलेदार, वकील वगैरे का होतात. . मराठे समाजातील मुले पोलीस व पोलीस अधिकारी का होतात ? आणि अस्पृश्य समाजातील मुले अशी का ? अस्पृश्य व स्पृश्य मुलातील भेद कशाने झाला ? ह्या सर्वांचे उत्तर एकच आणि ते म्हटले म्हणजे ' समाज परिस्थिती. ' घाणेरड्या परिस्थितीचे वातावरण अस्पृश्यांच्या मुलांवर होत गेल्यामुळे गुलामगिरीची दीक्षा त्यांना प्राप्त झाली आहे. ही परिस्थिती. म्हणजे खुषीचा सौदा नव्हे. गुलामगिरीची पध्दत नष्ट करणे आमचे कर्तव्य आहे. आणि या करिताच आपल्या समाजातून अगोदर गलिच्छ चालीरितींना मूठमाती मिळाली पाहिजे. कोणी म्हणेल अशा चालरिती संमाजातून काढून टाकणे आर्थिकदृष्ट्या अहितकारक आणि मोठे नुकसानी करणारे आहे व आपल्या समाजाच्या उपजीविकेला त्यामुळे अडथळा उत्पन्न होईल. परंतु माझ्यामते ह्या मुद्याने आपल्या सुधारणेच्या मार्गात वरिष्ठ म्हणविणारा समाज आपल्याच लोकांना चिथावून फंदफितुरी उत्पन्न करीत आहे आणि त्यांना सर्वांना माझा सवाल आहे की, वेश्या आपल्या छानछोकीच्या उपजीविकेकरीता आक्रमण करीत असलेल्या मार्गाचा व एखाद्या गृहस्थाश्रमी बाईच्या स्वाभिमान वृत्तीच्या काबाडकष्टाने मिळविलेल्या अन्नावरील उपजीविकेचा मार्ग याचे कधीतरी साम्य असू शकेल का ? येथे छानछोकीच्या उपजीविकेच्या मार्गात किती घाणेरडा प्रकार असतो याचा कुणी कधीतरी विचार केला आहे का ? अगदी स्पष्टपणे सांगायचे म्हणजे स्वाभिमानशून्यतेने जीवन कंठणे नामर्दपणाचे आहे. जीवनाकरिता स्वाभिमान