२६ 1000
` स्वावलंबन आणि स्वाभिमानाशिवाय तरणोपाय नाही
रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे रविवार तारीख १४ एप्रिल १९२९ रोजी भरवण्यात आली होती. पाहुणे मंडळीपैकी मुंबईचे श्री. देवराव नाईक, द. वि. प्रधान, भा. र. कद्रेकर, शंकरराव गुप्ते शंकर वडवलकरं, श्री. शिवतरकर, बाबा आडरेकर, गायकवाड, मोरे वगैरे मंडळी हजर होती. स्थानिक मंडळीपैकीं श्री. विनायकराव बर्वे, साठे राजाध्यक्ष, खानसाहेब देसाई, पितापुत्र बेंडके, शिवराम जाधव वगैरे मंडळी हजर होती
वरील परिषदेच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. यानंतर श्री..रगजी यांचे भाषण झाले. . यानंतर . श्री. बेंडके यांनी रायबहादूर बोले, अँडव्होकेट, आनंदराव सुर्वे, श्री. साळवी, सबजज्ज वगैरे मंडळीचे संदेश व तारा वाचून दाखविल्यावर अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी भाषण केले. ते म्हणाले
मला असे वाटते की, माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठीच असावा. मी देखील मजूर वर्गापैकी एक असून, इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या चाळीत राहतो. इतर GRAM मला देखील बंगल्यातून राहता आले असते पण माझ्या शेतकरी व अस्पृश्य बंधुंकरिता चाळीत राहूनच काम केले पाहिजे. याबद्दल मला. केव्हाही वाईट वाटत नाही. मला मुंबईला येऊन अवघी चार वर्षे झाली. अत्यंत हीन मानलेल्या समाजात जन्म झाल्यामुळे त्याच समाजासाठी जीवापाड मेहनत करणे मला भाग पडले आहे. तशात अस्पृश्य कामगारांना इतर कामगारांचे हक्क मिळवून देणे माझे कार्य आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी श्री. बेंडके यांचा परिचय झाला. त्यांनी खोती प्रकरणाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे व ती मी मान्य केली आहे. खोती पद्धतीचा फायदा व तोटा याचा विचार करून त्यासंबंधी नक्की योजना बिलांच्या रुपाने कायदेकौन्सिलात आणणे माझे कर्तव्य आहे. खोतीसारखी दुष्ट पद्धत कशी अंमलात आली याचे मला मोठे आश्चर्य वाटते. ह्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या चित्ताला शांती नाही. काबाडकष्ट करून तयार केलेल्या शेतीवर धनिकांनी ' आयत्या बिळावर नागोबा [' ] या [नात्याने ] [हल्ला ]
बहिष्कृत भारत : ३ मे १९२९.