१४-४-१९२९ स्वावलंबन व स्वाभिमानाशिवाय तरणोपाय नाही - Page 207

स्वावलंबन आणि स्वाभिमानाशिवाय तरणोपाय नाही १६५

अध्यक्षांच्या भाषणानंतर खालील ठराव एकमताने पारित करण्यात आला.

““ खोतीपद्धत ही निखालस गुलामगिरी आहे, ह्या पद्धतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सर्वस्वी खोताचा ताबेदार झाला आहे. उपरी कुळांची दशा तर होतेच होते पण पोचपावती देण्याची पद्धत अस्तित्त्वात नसल्यामुळे कायम घारेकप्यांचे हक्कही सुरक्षित राहत नाहीत. आर्थिक दृष्ट्या खोतीपद्धत कुळांना घातक आहे, इतकेच नव्हे तर, नेतिकदृष्ट्याही ही पद्धत विघातक असून कुळांना कोणत्याही प्रकारे सुस्थिती करून [घेण्यास ] स्वातंत्र्य उरत नाही. अशा या खोती पद्धतीचा ही परिषद तीव्र निषेध करते व ती नाहीशी करावी अशी सरकारास आग्रहाची [सूचना ] [करते. ] ["' ]

वरील ठरावावर श्री. रगजी, श्री. बेंडके यांची भाषणे झाली. याशिवाय किरकोळ ठराव पास झाल्यावर या परिषदेचे काम सायंकाळी ७ वाजता संपले. ' डॉ. आंबेडकर की जय ' ह्या घोषणेत परिषद आभार प्रदर्शन व पानसुपारीच्या समारंभानंतर बरखास्त करण्यात आली.