२७
मुंबई इलाख्यातील प्राथमिक शिक्षणाची प्रगती
मुंबई सरकारचे शिक्षणमंत्री ना. मौलवी रफिउद्दिन अहमद यांच्या निमंत्रणावरून महाबळेश्वर येथे गेल्या तारीख ६ मे १९२९ रोजी प्राथमिक शिक्षणाच्या प्रसाराच्या बाबतीत अगत्य बाळगणाऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आणि वेगवेगळ्या जातिधर्माच्या गृहस्थांची एक लहानशी परिषद, या इलाख्यात प्राथमिक शिक्षणाची प्रगती विशेष झपाट्याने कशी करता येईल आणि सध्याच्या प्राथमिक शिक्षणासंबंधाच्या कायद्यात कोणत्या दुरूस्त्या करण्याची आवश्यकता आहे, याचा विचांर करण्याकरिता भरली होती. डॉ. बांबासाहेब आंबेडकर हेही या परिषदेला हजर होते. त्यांनी आपले विचार शिक्षणमंत्री व परिषदेचे सभासद यांच्यापुढे स्पष्टपणे मांडले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रश्न _ आहे. सध्याच्या युगात ज्या देशामधील बहुजनसमाज निरक्षर आहे अशा देशाचा जीवनकलहात टिकाव लागावयाचा नाही हे सांगावयास नकोच. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वागीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. केवळ लोकांच्या खुषीवर हा प्रश्न सोपविल्यास प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होण्यास कैक शतके लागतील म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा लागतो. आघाडीस आलेल्या जगातील सर्व देशांनी सक्तीचा कायदा करूनच लोकांची निरक्षरता हद्दपार केली असे आपणास दिसून येते. जे वर्ग आधीच शिक्षणाचा लाभ घेतात त्यांच्यावर शिक्षणासाठी अर्थातच सक्ती करावी लागत नाही. ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही व जे त्या बाबतीत उदासीन असतात त्यांच्याकरिताच सक्तीच्या कायद्याची आवश्यकता असते. म्हणून या देशात शिक्षणामध्ये मागासलेले जे वर्ग आहेत त्यांच्या जिव्हाळयाचा हा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत कायद्याने सक्ती असावी अशासाठी, कै. ना. गोपाळ कृष्ण गोखले यांनी आणलेल्या तद्विषयक | बिलापासून चळवळ सुरू झाली. त्या बिलाला देशातील सर्व जनतेने विशेषत: मागासलेल्या वर्गाच्या पुढाऱ्यांनी जोराने पाठिंबा दिला. परंतु वेगवेगळ्या प्रांतात सक्तीचा कायदा होण्यास मध्यंतरी कैक वर्ष जावी लागली. मुंबई इलाख्यात प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा झाला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी
बहिष्कृत भारत : ३१ मे १९२९.