MR/Khand_18_1 - Page 21

तिसऱ्या भागात १४ जानेवारी १९४६ ते २५ नोव्हेंबर १९५६ या कालखंडातील डॉ. आंबेडकरांच्या भाषणांचा समावेश आहे, या भागात डॉ. आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्याप्रसंगी त्यांनी दिलेले ऐतिहासिक भाषण आहे. नेपाळ देशातील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत २० नोव्हेंबर १९५६ ला “ बुद्ध की कार्ल मार्क्स “या विषयावरील डॉ. आंबेकरांचे ऐतिहासिक भाषण झाले. हेच डॉ. आंबेडकरांचे शेवटचे भाषण मानले जायचे. परंतु हे भाषण शेवटचे भाषण नाही. काठमांडूवरून भारतात परत येताना ते वाराणशी आणि सारनाथ येथे गेले. त्या ठिकाणी त्यांची काशी विद्यापीठ आणि सारनाथ येथे एकूण चार भाषणे झाली. ।

काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे २५ नोव्हेंबर १९५६ ला डॉ. आबेडकेरांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी त्यांनी नाग व आर्य यांच्यातील संघर्ष, बौद्ध धम्म, ब्राम्हण व क्षत्रिय यांचा संघर्ष या संदर्भात आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून विचार मांडले. आर्यांचे भारतात आगमन होण्यापूर्वी नाग लोकांची भारतात वस्ती होती, आणि हे नाग लोक आयपिक्षा अधिक सुसंस्कृत असल्याचे या भाषणात डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केले.

डॉ. आंबेडकरांचे आपल्या आयुष्यातील शेवटचे भाषण सारनाथ येथील धम्मेक स्तूपाजवळ २५ नोव्हेंबर १९५६ ला झाले. तथागत बुद्धांनी ज्या ठिकाणी पंचवग्गीय भिक्खूंना आपला पहिला उपदेश करून धम्मचक्र प्रवर्तन केले, त्याजागी सम्राट अशोकाने एक स्तूप उभारला, त्या स्तूपास धम्मेक स्तूप म्हणतात.या स्तूपाच्या सावलीत डॉ. आंबेडकरांचा स्वागत समारंभ महाबोधी सोसायटीच्या वतीने ` आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी डॉ. आबेडकरांचे अखेरचे आणि ऐतिहासिक भाषण झाले. या भाषणात डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की, '' माणसा माणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्त्वानुसार जोडणारा बौद्ध धर्म हा. एकमेव आहे." धम्मेक स्तूपाजवळ डॉ. आंबेडकरांनी केलेले हे भाषण त्यांच्या जीवनातील शेवटचे भाषण ठरले. या शेवटच्या भाषणाविषयी अनेक लोकांना माहिती नाही. |

यापूर्वी डॉ. आंबेडकरांची काही महत्त्वाची भाषणे मराठी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. परंतु त्यांची सर्व भाषणे आतापर्यंत वाचक आणि अभ्यासकांना एकत्र उपलब्ध नव्हती. डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणांच्या या १८ व्या खंडामुळे त्यांची'मराठी भाषणे एकत्रितरित्या प्रथमच प्रकाशित होत आहेत. या खंडामुळे डॉ. आंबेडकरांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांची विशेष सोय झाली आहे. या भाषणांच्या आधारे डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे अधिक सखोल आणि वस्तूनिष्ठ अध्ययन करणे शक्य झाले आहे.

(सतरा)