डॉ. आंबेडकरांची भाषणे ही फक्त राजकीय भाषणे आहेत असे नाही तर त्यांची सर्वच भाषणे विदवत्ताप्रचूर आणि विचारप्रवर्तक आहेत. त्यामुळे या भाषणांना विशेष मोल आणि महत्त्व आहे. डॉ. आंबेडकरांची भाषणे एकत्रितरित्या नव्या पिढीला उपलब्ध करून देण्याचा जो उपक्रम शासन राबवित आहे. ते महाराष्ट्र शासनाचे फार मोठे कार्य आहे.
डॉ. आंबेडकरांचे खंड १८ चे मराठी साहित्य गोळा करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ गणले जाणारे, मराठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचे आगरच असलेले, अतिदुर्मिळ तसेच नवीन पुस्तके हमखास मिळण्याचे ठिकाण असलेल्या ' मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया 'चा महत्त्वाचा वाटा आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात दिनांक २९ जानेवारी १९८२ ते दिनांक २५ ऑक्टोबर १९८९ पर्यंत या कार्यालयातील कर्मचारी सौ. सु. मा. नेवरेकर यांना डॉ. आंबेडकरांचे मराठी साहित्याचे संशोधन करून ते टंकलिखित करण्यासाठी, या ग्रंथसंग्रहालयाचे संस्थाधीपाल कै. अच्युत तारी यांनी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात बसण्यासाठी सोयीस्कर अशी जागा उपलब्ध करून दिली. या ग्रंथसंग्रहालयातून (१) fafae-ga, (२) चित्रमय जगत्, (३) सत्यदीपिका, (४) ज्ञानप्रकाश, (५) निर्भीड, (६) नवाकाळ, (७) केसरी, (८) तरुण भारत, (९) चित्रा, (१०) जनता इत्यादी वृत्तपत्रांतील साहित्य आम्ही गोळा केले. ग्रंथसंग्रहालयातील कर्मचारीवर्ग आवश्यक असणारे ग्रंथ, वर्तमानपत्रांच्या फाईल्स इत्यादी वेळच्या वेळी तत्परतेने काढून देत असत आणि हे सारे विनामूल्य करत असत. त्यांच्या या अमूल्य सेवेबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक धन्यवाद. विशेष गोष्ट म्हणजे हे काम चालू असतानाच महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट ग्रंथालयांना डॉ. आंबेडकर पुरस्कार देण्याची घोषणा केली. हा पुरस्कार मिळविण्याचा पहिला मान या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने मिळविला आहे. |
खंड १८ साठी आवश्यक असलेले जनता पंत्राचे बरेचसे अंक नागपूरच्या डॉ. आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मिळाले. तर काही अंक मुंबई विद्यापीठातून मिळवून त्यांचे झेरॉक्स करून घेतले. जनता पत्राचे अंक तसे फारच मोठे होते परंतु तेथील कर्मचारीवर्गाने त्यांचे झेरॉक्स देऊन आम्हाला मोलाचे सहाय्य केले त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.
खंड १८ चे काम चालू असताना समितीच्या सदस्यांना वेळोवेळी दाखवून त्यांची संमती घेतली जात होती. काही भाषणी प्रा. अशोक गोडघाटे, श्री. एन. जी. कांबळे व डॉ. प्रा. कासारे यांना संशोधनाने मिळाली. त्याचा त्यांनी या खंडात समावेश केला. अशाप्रकारे सहाय्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. |
(अठरा)