२९-६-१९२९ आम्ही अस्पृश्य तेवढा एक समजतो - Page 217

: 3 0 |

आम्ही अस्पृश्य तेवढा एक समजतो

शनिवार ता. २९ जून १९२९ रोजी रात्रौ ७ वाजता परळ, मुंबई येथे दामोदर हॉलमध्ये रावबहादूर बोले, जे. पी. यांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत वर्गाची जंगी जाहीर सभा भरली होती. सभेस बहिष्कृत वर्गातील अलोट समुदाय जमला होता. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मे. डॉ. सोळंकी, मे. शिवतरकर, मे. द. वि. प्रधान, भा. र. कद्रेकर, रा. गुप्ते, ति. गायकवाड, ति. आडरेकर, ति. जाधव इत्यादि मंडळी प्रामुख्याने दिसत होती. ति. गायकवाड यांनी अध्यक्षांची. सूचना मांडून. तीस रा. वालावलकर यांनी अनुमोदन देताक्षणीच नियोजित अध्यक्ष रावबहादूर बोले, जे. पी. हे टाळ्यांच्या कडकडाटात अध्यक्षस्थानी स्थानापन्न झाले. अध्यक्षांचे प्रास्ताविक भाषण होऊन, सभेत खालीलप्रमाणे ठराव पास करण्यात आले :- | |

ठराव १ ला .-कोकण भागातील. विशेषतः चिपळूण, खेड व दापोली तालुक्यातील बहिष्कृत वर्ग आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमण करीत असता सोवळ्या हिंदू लोकांकडून त्यांचा अनन्वित छळ होत आहे, या त्यांच्या अधम कृतीबद्दल ही सभा त्यांचा तीव्र निषेध करून आपला संताप व्यक्त करीत आहे आणि वरील mera दाद लावून घेण्याकरिता अस्पृश्य पुढाऱ्यांचे एक शिष्टमंडळ नेक नामदार गव्हर्नरसाहेब याजकडे पाठविण्याची परवानगी देत आहे. |

ठराव २ रा.-कोकणातील बहिष्कृत वर्गाचे हितसंरक्षणाकरिता एक '* कोकण संरक्षक फंड '' उभारण्यात याबा अशी या सभेची सूचना आहे.

ठराव ३ रा.-बहिष्कृत वर्गातील श्री. चां. भ. खैरमोडे आणि रा. गाडेकर हे दोन विद्यार्थी चालू सालच्या बी. ए. च्या परीक्षेत व रा. कदम हा मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल ही सभा त्यांचे अभिनंदन करीत आहे.

ठराव ४ था.-डॉ. पी. जी. सोळंकी, एम. एल्‌. सी. यांची सरकारने मुंबई म्युनिसीपालिटीमध्ये निवड केल्याबद्दल ही सभा डॉक्टर साहेबांचे अभिनंदन करिते व योग्य नेमणूक झाल्याबद्दल संतोष व्यक्त करिते.

बहिष्कृत भारत : १२ जुलै १९२९.