MR/Khand_18_1 - Page 23

या खंड १८ च्या प्रकाशनासाठी सतत प्रयत्नशील असणारे मंत्री ना. दिलीप वळसे-पाटील आणि मा. खासदार श्री. रा. सु. गवई यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो. या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा खात्याचे मंत्री म्हणून नामदार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे जाताच त्यांनी सर्वप्रथम समितीच्या कामाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून समितीला तात्काळ मुदतवाढ तर दिलीच पण समितीच्या कामांना अग्रक्रम देण्याचा आदेश विभागाला दिला. ना. वळसे-पाटील यांनी आपल्या व्यस्ततेमधून वारंवार वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केले. समितीच्या दरमहा बैठका घेऊन प्रलंबित कार्याची त्वरित पूर्तता करण्यावर त्यांनी भर दिला. आज त्यांच्यामुळेच समितीच्या उर्वरित सर्व खंडांच्या कामांना विलक्षण वेग दिला गेला असून २१ खंडांचा हा नियोजित प्रकल्प अल्पावधीत पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. संदर्भ साहित्याचे आजवर दोन खंड प्रकाशित झाले असून त्यातील “ मूकनायक व बहिष्कृत भारत “ या खंडाची दुसरी आवृत्तीही संपण्याच्या मार्गावर आहे. आणखी दोन खंड होतील इतके संदर्भ साहित्य समितीकडे उपलब्ध आहे. अशा प्रकारे एकूण २५ खंडाचा हा महाप्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा समितीचा निर्धार आहे.

महाराष्ट्राची शान वाढवणारा हा ग्रंथप्रकल्प ज्यांच्या पुढाकाराने हाती घेतला गेला ते राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरद पवार आजही या प्रकल्पाकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात. आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

या ग्रंथाला प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी आपली हातातील सर्व कामे बाजूला ठेवून अतिशय विस्तृत अशी सूची बनवून दिल्याने ग्रंथाचे मोल वाढले. त्यांचे विशेष आभार. |

या प्रकल्पातील खंड १ ते १५ आणि खंड सतराचे मराठी भाषांतरही आम्ही वांचकांना अतिसत्त्वर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. समितीच्या सदस्य-सचिव पदाची धुरा आमच्यावर सोपवून समितीने आमच्यावर दाखवलेल्या विश्‍वासाला पात्र ठरण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार प्रा. टी. एम. कांबळे यांचे मार्गदर्शन आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. गंगाधर पानतावणे, कवीश्रेष्ठ प्रा. यशवंत मनोहर, प्रख्यात समीक्षक [प्रा. ] [केशव ] मेश्राम आणि या खंडाची अतिथी संपादक त्रयी तसेच समितीचे [सर्व ] [मान्यवर ] सदस्य यांच्या मार्गदर्शनामुळे समिती आपले नियोजित [लक्ष्य ] [निश्‍चित ] [गाठू ] [शकेल ] असा आम्हाला विश्वास वाटतो

(एकोणवीस)