१६-१०-१९२९ कामगारांना जात नाही म्हणून ओरडणाऱ्या स्पृश्य पुढाऱ्यांनी याचा जबाब द्यावा - Page 220

१७८ डॉ. वावासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे

मुंबईतील बहिष्कृतानी आपल्या कंबरा कसल्या पाहिजेत. प्रास्ताविक भाषणानंतर त्यांनी श्री. वनमाळी ह्यास खालील ठराव मांडण्यास विनंती केली :-

'" समाज समता संघ व भारतीय बहिष्कृत समाज सेवा संघ ह्यांच्या विद्यमाने भरलेली ही जाहीर सभा पुणे येथील बहिष्कृत हिंदूंनी त्यांच्या न्याय्य व मानवी हक्कांकरता सुरू केलेल्या सत्याग्रहास आपला पूर्ण पाठिंबा देत असून ज्या ज्या स्पृश्य लोकांनी त्यांना मदत केली त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानते व आपल्या दृढनिश्चयापासून न डगमगता आपला सत्याग्रहाचा लढा चालू ठेवण्याची बहिष्कृत वर्गास विनंती करते “

वरील ठराव मांडताना श्री. वनमाळी ह्यांनी बहिष्कृतांना मंदिरात जाण्याच्या आपल्या हक्कांचे समर्थन करून तो हक्क बजावून घेत असताना स्पृश्य लोकांनी का विरोध करावा ह्याबद्दल आश्चर्य प्रकट केले.

श्री. वडवलकर ह्यांनी ठरावास दुजोरा देणारे भाषण केले. त्यानंतर ही सभा शांततामय सत्याग्रही लोकांवर हल्ला करणाऱ्या स्पृश्य लोकांचा निषेध करते, अशा अर्थाचा ठराव श्री. के. सी. ठाकरे ह्यांनी मांडिला.

वरील ठरावास श्री. द. वि. प्रधान यांनी दुजोरा देणारे भाषण केले,

श्री. खटावकर व आचार्य ह्यांची भाषणे होऊन ठराव पास झाला. तिसऱ्या ठरावान्वये अस्पृश्य लोकांवर होत असलेला हल्ला स्वतःच्या डोळ्याने पाहात असताना देखील कलेक्टरने ताबडतोब बंदोबस्त केला नाही म्हणून दिलगिरी प्रदर्शित करण्यात आली. या सभेत श्री. देवराव नाईक व भुस्कुटे यांचीही भाषणे झाली. कोणत्याही जुलुमी सत्तेविरुद्ध सत्याग्रह करण्याचा हक्क जुलुमाखाली दडपलेल्या लोकांस असतो म्हणून तो करण्याचा सल्ला डॉ. आंबेडकर बहिष्कृतास देतात परंतु येथे गिरणी कामगार युनियनचा गिरण्यांच्या मालकांविरुद्ध जो लढा सुरू झाला होता, त्यास डॉ. आंबेडकरांनी का विरोध केला, असा प्रश्‍न सभेच्या सुरुवातीला एका पुच्छकाने केला असता सभेचे काम बरखास्त करण्यापूर्वी त्याचे उत्तर देण्याचे आश्वासन त्यांनी त्यास दिले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब म्हणाले,

आपण गिरणी कामगार युनियनला का विरोध केला याबाबत गेल्या संपाच्या कारणांची व परिस्थितीची बऱ्याचशा जणांना माहिती नाही असे दिसते. एकतर हा संप सार्वत्रिक नव्हता, गिरण्यात काम करणाऱ्या मुसलमान कामकऱ्यांपैकी एकही कामगार संपात सामील झालेला नव्हता व ज्या भागातील गिरण्यांमध्ये मुसलमान कामगार जास्त संख्येने आहेत, त्या गिरण्या अगदी बिनबोभाट चालू होत्या. तसेच संपाच्या एक दिवस अगोदर गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष,