१६-१०-१९२९ कामगारांना जात नाही म्हणून ओरडणाऱ्या स्पृश्य पुढाऱ्यांनी याचा जबाब द्यावा - Page 222

१८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ज्यांना बहिष्कृत वर्गाच्या सहकार्याची अपेक्षा असेल त्यांनी बहिष्कृतांस न्याय दिला पाहिजे. जेथे जी माणसे माझ्या बहिष्कृत वर्गास न्याय देऊन त्यांची गुलामगिरीतून व आहे त्या स्थितीतून वर आणण्याची अंत:करणपूर्वक चळवळ करीत असतील त्या लोकांशी सहकार्य करण्यास मी कधीही मागे पाहणार नाही. परंतु प्रत्येक चळवळीचे सूत्र म्हणजे बहिष्कृतांस न्याय व समतेची. वागणूक हेच असेल, तरच ते न्याय्य व रास्त ठरेल. अप्पलपोट्या स्पृश्यांच्या फायद्याच्या चळवळीशी मला काही कर्तव्य नाही. पुन्हा आपण सर्व लोकांस पर्वतीच्या सत्याग्रहास मदत करण्याची विनंती करतो. अशाप्रकारे सभेचे फाम संपल्याचे ९ वाजता जाहीर झाले.