१८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
गुणभेदाचे अंतर नाहीसे झाले पाहिजे. त्यासाठी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. आपण फार जागृत झाले पाहिजे. संधी प्राप्त होणे आणि ती पदरात पाडून घेणे हे आपल्याकडे आहे. शिक्षणाच्या अभावी हे सुसाध्य होत नाही. आपण स्वतः आपले'हक्क बळकावण्याचा, मी बळकावण्याचाच म्हणतो- प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपला हा माणुसकीचा झगडा आहे. यासाठी शेवटी सत्याग्रह करावा लागेल. तो शेवटचा उपाय होय. स्वकीय आणि परकीय या उभयतांशीही सत्याग्रह करावा लागेल. उभयतांही अन्याय जसे करतील तसेच त्यांच्या विरोधात उपाय योजले पाहिजेत. पुराणकालीन कौरवपांडवांचा एवढा मोठा लढा का झाला ? तर केवळ राज्य. अस्पृश्यता सर्व समाजाचे कल्याण होऊ देणार नाही. मात्र आपला आपण दर्जा वाढविला पाहिजे. लक्षात ठेवा की, आपल्या उद्धाराचा लढा आपणाला केव्हा तरी करावा लागणारच. स्पृश्य जनतेतील दुराभिमान कसा जाणार. पुराणमताभिमानी हे असणारच. मला अखेरीस इतकेच सांगावयाचे आहे की, स्वावलंबनाचा मार्ग चोखाळा. तुम्हाला या स्थितीत ठेवण्याची कारवाई फारच बध्दमूल आहे. तुमचे ते महारकी वतन, त्या वतनाच्या अभिमानाने तुम्ही किती परावलंबी झाला आहात याची तुम्हाला कोठे कल्पना आहे. या महारकी वतनाने महार हा खेडेगावात कायमचाच डांबून टाकला आहे.
महार म्हणजे सरकारी भिकारी. प्रत्येक खेड्यात असे सरकारी भिकारी या वतनामुळे लाभले आहेत. महाराने या भिकारी करणाऱ्या वतनाच्या नादी न लागता मनगटाचे जोरावर संघर्ष केला पाहिजे. स्वतःच्या शिक्षणार्थं त्याने स्वतःच मदत केली पाहिजे. त्याला दुसरे कोणीही मदत करणार नाहीत. काही उदारमनस्क मदत करतील.
उंदरांची मदत केवळ उसनवारी होय. महार लोक गरीब पण संख्येने काय कमी आहेत ? त्यांनी स्वतःचीच मदत एकवटावी म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आपोआपच सुटेल. धारवाड जिल्ह्यातून एक लाख महार असतील. प्रत्येकाने एक एकच रूपया दिला असता एक लाख रूपयांचा फंड जमेल आणि त्यावर शंभर मुलांचे बोडिंग चालेल. सांप्रत येथे एक बोर्डिंग स्थापन झाले आहे. सरकारी आश्रम आहे. ग्रँट पुरेशी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामागे दहा रूपये मिळतात. इतरत्र इतर मदत दिली जात नाही. तूर्त पंधराच मुलांची सोय झालेली आहे. मांडले असता ही संख्या दुपटीपर्यंत नेता येईल; पण यापेक्षा तुमची सोय तुम्ही करा. सध्या ह्या बोर्डिंगची व्यवस्था आपल्याकडे