१८-१२-१९२९ केवळ शिक्षणाने योग्यता येते असे नाही - Page 227

केवठ शिक्षणाने योग्यता येते असे नाही १८५

आहे. आपण मुबईस आणि बोडिंग येथे. अंतर फार दूर. व्यवस्था व्हावी तशी होत नाही यासाठी एक कमिटी स्थापन करा आणि आपली आपण व्यवस्था पहा. धारवाड जिल्ह्याच्या अस्पृश्य विद्यार्थ्यांची सोय आहे, यापेक्षा विशेष झाली पाहिजे ती तुमची तुम्हाला करून घेता येईल.

याप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी आपल्या बांधवांस कळकळीने सांगून आपणास अध्यक्षस्थान दिल्याबद्दल आभार मानून टाळ्यांच्या गजरात आपले भाषण संपविले.