१९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
५. सद्याचा राज्यघटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याचा वर्तुळ परिषद हा अत्युत्तम मार्ग असल्याचे ही काँग्रेस मान्य करते आणि अस्पृश्य वर्गानी त्यात सहभागी व्हावे असा हितोपदेश करते. ही काँग्रेस सरकारला असे सुचवू इच्छिते की, ही वर्तुळ परिषद पूर्णतः यशस्वी करण्याकरिता सरकारने सर्वच पक्षांना त्यात भाग घेण्याकरिता अस्पृश्य वर्गालासुद्धा योग्य प्रतिनिधीत्व देऊन बोलावले पाहिजे.
६. या देशाच्या कायदेमंडळावर अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत असल्याच्या पद्धतीला ह्या काँग्रेसचा विरोध आहे. अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी त्याच समाजाने निवडणुकीद्वारे निवडून द्यावेत अशी ह्या काँग्रेसची मागणी आहे आणि स'यमन कमिशनने ज्या शिफारसी केल्या आहेत, ज्यात अस्पृश्य वर्गाचे नियुक्त प्रतिनिधी हे दुसऱ्या वर्गाच्या प्रतिनिधींनी निवडून द्यावे व त्यास गव्हर्नरचे प्रमाणपत्र असावे अशी तरतूद आहे, त्याचा निषेध करते.
७. स्वतंत्र मतदार संघाच्या उपयुक्ततेबाबत विश्वास असूनसुद्धा अस्पृश्य वर्गाच्या प्रतिनिधीत्वाकरिता राखीव जागासहित संयुक्त मतदार संघाचे तत्त्व मान्य करण्यास ही काँग्रेस तयार आहे, परंतु त्याकरिता प्रौढ मतदान पद्धती स्वीकारणे आवश्यक आहे.
८. ज्या अस्पृश्य वर्गाना सामाजिक विषमतेच्या अत्यंत निकृष्ट अवस्थेत जीवन जगावे लागत आहे, त्यांच्या तुलनेत इतर दुसरे अल्पसंख्य वर्ग काहीच नाही, असे असूनही सायमन कमिशनने अस्पृश्य वर्गाला प्रतिनिधीत्व मिळण्याच्या मागणीला कमी लेखून त्यांच्या हक्कांना डावलले व इतर अल्पसंख्य वर्गाना मात्र विशेष प्रतिनिधीत्व बहाल केले, याबद्दल ही काँग्रेस खेद व्यक्त करते. सर्व अल्पसंख्यांकांना समानतेचे तत्त्व समान प्रमाणात लावण्यात यावे असे या काँग्रेसचे मत असून, अशी मागणी करते की, अस्पृश्य वर्गाला त्यांची विशिष्ट सामाजिक निकृष्टता विचारात घेऊन त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणाऱ्या प्रतिनिधीत्वाव्यतिरिक्त अधिक प्रमाणात जागा देण्यात याव्या.
९. ही काँग्रेस असेंब्ली आणि afta ऑफ स्टेट मध्ये अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी त्याच लोकांनी निवडून देण्याकरिता अप्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत मान्य करते, परंतु त्यात अस्पृश्य वर्गाचा यथायोग्य प्रतिनिधीत्वाचा हक्क मान्य करण्यात यावा अशी मागणी करते.
१०. सायमन कमिशनने कौंसिल ऑफ स्टेट मध्ये अस्पृश्य वर्गाच्या प्रतितिधीत्वाची कोणतीही तरतूद केलेली नाही. याबद्दल ही काँग्रेस खेद व्यक्त करते आणि मागणी करते की, कौंसिल ऑफ स्टेट मध्ये अस्पृश्य वर्गाचे योग्य प्रतिनिधीत्व मान्य करण्यात यावे.