८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 235

एकसंध भारत आमचे ध्येय आहे १९३

११. असेंब्लीची फेरघडण करण्याच्यादृष्टीने सायमन कमिशनने जो आराखडा तयार केलेला आहे त्याची उपयुक्तता लक्षात घेता ह्या काँग्रेसचे असे मत आहे की, तो आराखडा असेंब्लीपेक्षा कौंसिल ऑफ स्टेटकरिता अधिक उपयुक्त आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि कौंसिल ऑफ स्टेट हे अधिक लोकशाहीप्रधान बनवण्याच्या दृष्टीने त्याच्यात आवश्यक ती घटनात्मक सुधारणा करण्याची गरज लक्षात घेता, ह्या परिषदेचे असे मत आहे की, असेंब्लीकरिता सायमन कमिशनने जो आराखडा तयार केला आहे, तो कौंसिल ऑफ स्टेटकरिता लागू करण्यात यावा आणि असेंब्लीची घडण ही प्रत्यक्ष निवडणुकीच्याद्वारे करण्यात यावी.

१२. सायमन कमिशनने हिंदुस्थानातील लष्कराच्या बाबतीत जी योजना सुचविली आहे, ती ह्या काँग्रेसला मुळीच मान्य नाही. ह्या काँग्रेसचे असे मत आहे की, लष्कर हे जरी राखीव खाते असले तरी हिंदुस्थान सरकारच्या जबाबदारीच्या अधिकारातून ते काढून घेण्यात येऊ नये.

१३. ह्या काँग्रेसची अशी खात्री पटली आहे की, हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गाची एक मध्यवर्ती अखिल भारतीय संघटना असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन ही काँग्रेस एक कमिटी नियुक्त करीत आहे ; आणि

(१) या कमिटीने अशा अखिल भारतीय संघटनेची घटना तयार करून ती

काँग्रेसच्या पुढील अधिवेशनासमोर मांडावी; आणि |

(२) ही कमिटी काँग्रेसची वर्किंग कमिटी म्हणून पुढील वर्षाकरिता कार्य

करील आणि अस्पृश्य वर्गासंबंधी निगडीत असलेल्या. सर्व प्रश्‍नाबाबत तसेच

देशातील सद्याच्या राजकीय परिस्थितीत उद्भवणाऱ्या प्रश्‍नासंबंधी विचार

करील." १

अध्यक्षीय भाषण

या अधिवेशनात दि. ८ ऑगस्ट १९३० रोजी डॉ. आंबेडकरांनी केलेले अध्यक्षीय भाषण फारच महत्त्वाचे व विचार प्रवर्तक होते. ते आपल्या भाषणात म्हणाले,-

““ सज्जनहो |

आपण आजच्या कामकाजाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी मला दिलेल्या निमंत्रणाबद्दल मला आनंद होत असून आपण हा बहुमान मला दिल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. तुम्ही माझ्यावर हा जो विश्वास टाकला त्याचे

१ विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास : हि. ल. कोसारे पृ. १४८, १४९, १६९ आणि १७१.