८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 245

एकसंध भारत आमचे ध्येय आहे २०३

वापरण्याचे त्याने नाकारले , तर या अधिकाराचा आपणास काय उपयोग होईल? आपल्या हितरक्षणाकरिता रामबाण उपाय म्हणजे भावी स्वयंशासित भारताच्या कार्यकारी मंडळावर ताबा मिळविण्यातच उपाय आहे, असे दिसते आणि देशाच्या कायदेमंडळात पुरेसे प्रतिनिधीत्व प्राप्त करण्यानेच हे तुम्हाला साध्य होऊ शकेल. केवळ याच एकमेव साधनामुळे आपण सत्ताधाऱ्यांच्या दैनंदिन वागणुकीवर नजर ठेवू शकू. तुम्हाला याशिवाय आणखी काही संरक्षण तरतूदी व हमी मिळत असल्यास तीही अवश्य घ्या. कारण त्यामुळे तुमच्या संरक्षण-साधनात भर पडेल. परंतु पुरेशा प्रतिनिधीत्वाच्या बदलीमध्ये मात्र दुसऱ्या कोणत्याही बाबींचा तुम्ही स्वीकार करू नये. आणि तुम्हाला पुरेशा प्रतिनिधीत्वाच्या स्वरुपात हमी दिल्याशिवाय जर सध्याच्या घटनेमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न झाला तर तो नाकारणे ही पूर्णतः तुमच्या अधिकारातील बाब आहे. | |

१०. ' पुरेसे प्रतिनिधीत्व ' हे शब्द आज प्रत्येक अल्पसंख्यांक जमातीच्या तोंडी आढळून येतात. परंतु प्रत्यक्ष संख्येच्या स्वरूपात त्याचा अर्थ सांगणे कठीण असल्यामुळे या संदिग्ध व अनिश्‍चित अर्थाच्या रुपात, तो एक टिंगलीचा विषय होऊन बसला आहे. म्हणून जर आपणाला आपल्या मागण्या सादर करावयाच्या असतील तर, त्या ' शब्दाचा' निश्‍चित अर्थ संख्येच्या स्वरूपात आपण तयार केला पाहिजे. काँग्रेसच्या वर्तुळात प्रचलित असलेल्या मतप्रणालीनुसार ' पुरेसे प्रतिनिधीत्व' याचा अर्थ 'लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व' असा ते

करतात. माझ्या मते अल्पसंख्यांकांच्या प्रतिनिधीत्वाची ही गणीती बुद्धीची विचारसरणी अपक्व आणि मूर्खपणाची कल्पना आहे व भारतातील बहुसंख्यांकांच्या मनात अल्पसंख्यांकांबद्दल जी अनुदारपणाची भावना प्रचलित आहे तिचीच ती प्रतिक्रिया मात्र आहे. आपल्या जातबांधवांपासून व तिच्या सामाजिक दर्जापासून जेवढी शक्ती मिळण्यासारखी आहे ती तर अजूनही या [अल्पसंख्यांक ] जमातीजवळ आहेच, परंतु ती अत्यंत तुटपुंजी आहे, असे वाटल्यामुळेच [त्या ] आपल्या संरक्षणासाठी तिच्यात वृद्धी झाली पाहिजे, असा हकक [सांगत ] आहेत. या अशाप्रकारच्या प्रतिनिधीत्वातील वाढीशिवाय शासकीय [सत्तेने ] सुसज्ज झालेल्या बहुसंख्यांकांशी सामना देण्यास [त्या ] [पुरेशा ] [समर्थ ] [आहेत, ] [असे ] त्यांना वाटत नाही. या दृष्टिकोनातून पाहिल्यास अल्पसंख्यांकांना [त्यांच्या ] लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या जागा मिळणार आहेत [त्यामध्ये ] [वाढ ] [केल्यानेच ] [त्यांना ] संरक्षण दिल्यासारखे होईल. आता हे जर खरे असेल तर, कोणीही आसे विचारील की, अल्पसंख्यांक -जमातीस [तिच्या ] [लोकसंख्येच्या ] प्रमाणातच प्रतिनिधीत्वाच्या जागा ठेवल्यास [त्यांच्या ] [संरक्षणाची ] [व्यवस्था ] [झाली ] [असे ] [कसे ] होईल? अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाची [भाषा ] [वापरून ] [त्यांचे ] [प्रतिनिधीत्व ] [केवळ ] त्यांच्या लोकसंख्येइतकेच मर्यादित [ठेवणे ] [हे ] [परस्परविरोधी ] [आहे. ] अल्पसंख्यांकांना