८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 250

२०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

वर्गापेकीही नाहीत अशा व्यर्क्तीनासुद्धा दलित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून मेमण्याचा अधिकार देण्याची अत्यंत अनपेक्षित शिफारस सायमन कमिशनने केलेली आहे. तथापि, हे राखीव उपाय असल्यामुळे त्यांचा विचार करण्यासाठी आपणाला वेळ खर्च करण्याची आबश्वकता नाही. परंतु सायमन कमिशनची मुख्य योजनासुद्धा माझ्या मते स्वीकारणीय नाही. त्यानुसार दलित वर्गासाठी राखीव जागा ठेवून संयुक्त मतदार संघाद्वारा त्यांच्या प्रतिनिधींची निवडणूक व्हावयाची आहे. यापेक्षा अधिक जर त्यात काहीच नसते तर आपल्या सध्याच्या स्थितीत यामुळे बरीच सुधारणा झाली असती. परंतु त्या प्रांताच्या गव्हर्नरकडून तसे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय कोणत्याही दलित वर्गाच्या उमेदवाराला निवडणुकीसाठी उभे राहता येणार नाही, अशी या योजनेला अट घालण्यात आली आहे. ही पद्धती अस्विकारणीय आहे, याचे कारण म्हणजे ही पद्धती सध्या अस्तित्वात असलेल्या नेमणुकीशी इतकी मिळती जुळती आहे की त्या दोहोपैकी कोणती निवडावी हा प्रश्‍नच आहे आणि ज्या मतदार संघामध्ये केवळ एकाच उमेदवाराची जागा आहे तेथे फक्त गव्हर्नर एकालाच असे प्रमाणपत्र देणार आहे. त्यामुळे अशा मतदार संघाबाबत ही निवडणुकीची पद्धत म्हणजे केवळ साधी व सोपी नेमणुकीची पद्धत ठरते. ही प्रमाणपत्रवाली पद्धती प्रत्यक्षात कशी कार्य करणार आहे, याबद्दल काहीच सांगता येण्यासारखे नाही आणि हे प्रमांणपत्र देण्यासाठी कोणत्या बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत हेही गौप्यच आहे. कमिशनची सूचना अशी की ''गव्हर्नरांनी दलित वर्गाच्या संघटनांचा सल्ला घेऊन हे ठरवावे किंवा त्यांना योग्य वाटल्यास अशा सल्ल्याविरहितही सर्टिफिकेट ad. या दोन्हीपैकी कोणत्याही सूचनेला आपण संमती देऊ नये. जर संघटनांचा सल्ला घेण्याची पद्धती लागू करण्यात आली तर जनतेला कितीही नावडता असला तरीसुद्धा आपला उमेदवार स्वीकृत व्हावा या उद्देशाने त्याला केवळ पाठिंबा देण्यासाठी अनेक दिखाऊ संघटना त्यामुळे निर्माण होतील. दुसरी पद्धती लागू करण्यात आली तर त्याचा परिणाम घाणेरड्या अधिकारशाहीमध्ये होऊन सर्टिफिकेट देण्याची शक्‍ती मामलतदार व तहसीलदारांच्या हातात जाईल. कारण गव्हर्नरला जर काही बुद्धिवादी धोरण स्वीकारावयाचे असेल तर या अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसारच त्याला प्रमाणपत्र द्यावे लागेल. हे तहसीलदार व मामलतदार लोक कोणत्या वर्गापैकी आहेत, हे तुम्ही जाणताच आणि दलित वर्गासंबंधीची व त्यांच्यातील शिकलेल्या लोकांसंबंधी त्यांची वृत्ती कशी आहे, हेही तुम्हाला माहीत आहेच आणि म्हणून हे लोक प्रमाणपत्रासाठी कोणत्या प्रकारच्या लोकांची शिफारस करतील, याचा अंदाज तुम्ही बांधू शकाल.