एकसंध भारत आमचे ध्येय आहे | २११
करण्यात आला नाही. दलित वर्गाला त्याच्या अशा दुर्बल अवस्थेमध्ये अधिकारी- वर्गाच्या मदतीवंर अवलंबून राहण्यास सांगण्यांत येते. अनुभवाद्वारे आम्हास कळून चुकले आहे की अधिकांरीवर्ग स्वत:वाचून दुसऱ्या कोणाचाही मित्र नसतो
आणि त्याचे मित्रत्व आणि मदत त्याच्या स्वतःच्या हितसंबंधावर अवलंबून
असते. - या दहा वर्षाच्या काळात या अधिकारी वर्गाने दलित वर्गाजवंळून जितके घेतले त्यापेक्षा किती तरी कमी दिले, हे सांगण्यास मला खेद वाटतो. ते काहीही असो,ही संशयास्पद असलेली अधिकारी वर्गाच्या मदतीची अपेक्षाही भावी हिंदुस्थानात दलित वर्गाला करता येणार नाही. म्हणून दुसऱ्या प्रत्येक अल्पसंख्य जमातीला जर पुरेसे प्रतिनिधीत्व देण्यात येत आहे, तर दलित वर्मालाही ते मिळू नये काय? प्रांतीय विधानसभांमध्ये सायमन कमिशनने दलित वर्गासाठी सुचविलेले प्रतिनिधीत्वाचे प्रमाण कोणते? त्यांचे म्हणणे असे, अशा प्रकारच्या राखीव जागांची संख्या त्या मतदार संघाच्या दलित वर्गाच्या लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्याच्या तीन चतुर्थांश इतकी असावी. आता. भारतातील इतर अल्पसंख्य जमातींना सायमन कमिशनद्वारा देण्यात आलेले प्रतिनिधीत्वही पाहा. मुरूलमानांनी लखनौ करारामध्ये काँग्रेसवर कुरघोडी करून बळजबरीने मिळविलेले अत्याधिक प्रतिनिधीत्व तसेच कायम राहावे याला परवानगी देण्यात आली आहे. भारतीय ख्रिश्चनांच्या, अँग्लो इंडियनांच्या व युरोपियनांच्या बाबतीत त्यांना केवळ त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व दिले असे नाही तंर, पासंगाच्या अतिरिक्त जागाही त्यांना देण्यात. आल्या. ही भूलथाप नव्हे काय? जी जमात अनेक अडचणीत सापडलेली आहे तिला उदार वागणूक द्यावयाची नसेल तर कमीत कमी न्याय्य वागणूक मिळण्याचा.तिचा हक्क नाही काय? भारताच्या केन्द्रीय कमिटीनेसुद्धा दलित वर्गावर अन्याय करून केवळ त्यांच्या लोकंसंख्येच्या प्रमाणात त्याला प्रतिनिधीत्व fee .. |
२१. सुरवातीपासूनच केन्द्रीय संसदेचे. दरवाजे दलित वर्गासाठी कधीही उघडण्यात आले. नसून १९२१ साली जेव्हा लोकसंख्येच्या आधारावर. :तिचे पुनर्संघटन. करण्यात आले. तेव्हाही दलित .बर्माला तेथे शिरकाव: मिळाला नाही... .: १९२६ सालापर्यंत १५० सभासद असलेल्या विधानसभेत दलित वर्गाला केवळ एक जागा देण्याची मेहेरबानी करण्यात आली होती. :राज्यसभा तर अजूनही त्यांच्यासाठी बंदच आहे. केन्द्रीय विधानसभेत. दलित वर्गाला प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून सायमन कमिशनने थोडासा [प्रयत्न ] [केला ] [असला ] [तरी ] त्यांच्या योजना केवळ विधानसभेपर्यंतच मर्यादित असून [त्या ] राज्यसभेपर्यंत पोहोचल्या नाहीत. या तुटपुंज्या सहानुभूतीबद्दल मी त्यांचा आभारी असलो तरी