२१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सायमन कमिशनची नेमणूक या त्यांच्या कृपण वर्तनाबद्दल माझी तक्रारही आहे.
बऱ्याच विधानसभेत होण्याच्या दरम्यानच्या काळात दलित वर्गांपैकी लोकांना
असा गाजावाजा घेण्यात आले आणि सरकारसहित देशाच्या सर्व भागातून सर्वानी
केला आहे की, दलित वर्गाची लोकसंख्या प्रत्यक्ष शिरगणतीत आढळणाऱ्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. शिरगणतीचा कमीत कमी आकडा घेतला तरी सायमन कमिशननुसार दलित वर्गाची लोकसंख्या शेकडा वीस इतकी आहे. परंतु सायमन कमिशनने विधानसभेत जागा देताना मात्र शेकडा आठपेक्षा अधिक जागा देण्यास नकार दिला आणि राज्यसभेत तर एकही जागा दिली नाही.
२२. आपल्या हक्कांचे व गरजांचे हे पद्धतशीर अवमूल्यन सायमन कमिशनद्वारा का करण्यात यावे हेच मला कळत नाही. सायमन कमिशनने दलित वर्गाबाबत केवळ न्याय्य भूमिकाच नव्हे तर उदार भूमिका घ्यावी, अशी आपणापैकी प्रत्येकाची अपेक्षा आहे. अशी उदार भूमिका घेऊ नये याला कोणतेही कारण नाही. एखाद्या अल्पसंख्य जमातीच्या राजनिष्ठेबद्दल घटना तयार करताना त्यांना काय हक्क मिळतील याचा मला सध्या तरी अंदाज नाही. परंतु ज्याअर्थी, भारतात ही राजनिष्ठा हक्क प्रदान करताना विचारात घेण्यात येत आहे त्याअर्थी, दलित वर्गाची राजनिष्ठा अमर्याद आहे असेच म्हणावे लागेल. त्यांनी इंग्रजी राज्यावर केवळ एक तत्त्वाचा प्रश्न म्हणून प्रेम केले एवढेच नाही तर अकृत्रिमं प्रेम केले आहे. तथापि, दलितांना अधिक उदार वागणूक मिळावी या मागणीमागे त्यांची अगतिक स्थिती हाच मुख्य युक्तिवाद
आहे. भारतातील कोणतीही अन्य अल्पसंख्य जमात इतक्या हीन दर्जाला ' पोहोचलेली, दडपून टाकलेली आणि दुर्बल नाही. त्यांच्या गरजा इतक्या अधिक
व इतक्या साध्या प्रकारच्या आहेत की भारत हे स्वयंशासित राष्ट्र व्हावे अशी मागणी करणे त्यांना भाग आहे. ज्या जमातीवर एवढे अन्याय करण्यात आले तिला वस्तुतः अत्यंत उदार वागणूक मिळावयास हवी. परंतु सायमन कमिशनद्वारा दलित वर्गाला केवळ उदारपणाची वागणूक मिळाली नाही, इतकेच ` नव्हे तर साधा न्यायही मिळालेला नाही. कोणी असेही विचारू शकेल की लॉर्ड ब्रकनहेड यांनी सायमन कमिशनच्या नियुक्तीचा ठराव पार्लमेंटमध्ये मांडताना ज्या
भावना व्यक्त केल्या त्यांचे काय झाले? तेव्हा असे सांगण्यात आले की “दलित वर्गाचे आम्ही विश्वस्त (ट्रस्टी) असून त्यांच्या संरक्षणाची पुरेशी व्यवस्था केल्याशिवाय आम्ही त्यांना दुसऱ्याच्या हातात सोपवू शकत नाही.“ या गंभीर भावनांची पूर्ती सायमन कमिशनच्या शिफारशीत आढळून येते काय? सद्गृहस्थहो |
आपणाला अन्य लोक कशी वागणूक देत आहेत, याबद्दल आपण