८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 255

एकसंध भारत आमचे ध्येय आहे २१३

सतर्क राहिले पाहिजे. मला अशी भीती वाटते की इंग्रज आपल्या दुर्दैवी स्थितीची जी जाहिरात करीत आहेत ती आपली दुर्दशा नष्ट करण्यासाठी नसावी तर अशा प्रकारची पळवाट भारताच्या स्वराज्याची वाट अडविण्यास उपयुक्त वाटल्यामुळे ते अशी जाहिरात करीत असावे. अशा स्थितीत आपल्यासाठी ब्रिटिशांनी काही केले याबद्दल विचलित न होता आणि भविष्यात आपले काय होईल याची अनाठायी काळजी न करता आपल्या पुढाऱ्यांनी कोणाचीही भीती न बाळगता उदारषणाच्या वागणुकीबद्दल नसला तरी सुयोग्य वागणूक आम्हाला मिळालीच पाहिजे, याबद्दल आग्रह धरावा, हे त्यांचे कर्तव्य आहे. कारण आमची स्थितीच तशी वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे आपणाला तसा हक्क आहे.

५. दलित वर्ग आणि स्वराज्य

२३. भावी स्वयंशासित भारतात आपणाला कोणत्या संरक्षण तरतुदींची व हमीची आवश्यकता आहे याबद्दल मी पुरेशी माहिती दिली, असे मला वाटते. तथापि, या परिषदेसमोर असलेले विषय एवढ्यानेच संपत नाहीत. सध्या देशात चालू असलेल्या राजकीय चळवळीबद्दल या परिषदेने विचार करण्याचे टाळले व तीवर आपले मत व्यक्त केले नाही तर तिचा उद्देश पूर्ण झाला असे कदापि म्हणता येणार नाही. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता येथे डिसेंबर १९२८ साली भरलेल्या परिषदेमध्ये ब्रिटिश पार्लमेंटला देण्याच्या अंतिम नोटीसीच्या स्वरूपाचा एक ठराव पास करण्यात आल्याचे तुम्हाला आठवत असेलच. या ठरावात डिसेंबर १९२९ च्या आत भारताला ब्रिटिश साम्राज्यांतर्गत सार्वभौम राष्ट्राचा दर्जा लागू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून या कर्तव्यात ब्रिटिश पार्लमेंट अयशस्वी ठरल्यास भारतीय काँग्रेसच्या ध्येयात बदल करून पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात येईल, अशी धमकीही देण्यात

आली आहे. या काँग्रेसच्या निर्वाणीच्या खलित्याचा व्हाईसरॉयद्वारा भारतीय

राज्याचा दर्जा साम्राज्यांतर्गत सार्वभौम असावा, हाच ब्रिटिशांचाही उद्देश असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याने कॉग्रेसचे समाधान झाले नाही. 'तो एक उद्देश असावा' इतकेच त्यांना पुरेसे वाटत नव्हते, तर सार्वभौम राज्याचा दर्जा ताबडतोब देण्यात आला पाहिजे असे तिला वाटत. होते व म्हणून जेव्हा तिचे. अधिवेशन डिसेंबर १९२९ ला भरले तेव्हा तिने आपले ध्येय भारताचे स्वराज्य [प्राप्त ] करणे हे असल्याचा ठराव पास करून एक पाऊल पुढे टाकले. 'या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या ध्येयाबद्दल तुमचे मत काय़ आहे, हे तुम्हाला घोषित [करावे ] लागेल. आपल्या दृष्टिकोनातून आपण स्वराज्याची मागणी खारीजही करू शक्‌. ती अव्यवहार्य असून देशाच्या सध्याच्या स्थितीत संकटकारकही