एकसंध भारत आमचे ध्येय आहे २१५
खुंटविली जात आहे, यात शंका नाही. कै. गोखल्यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे “सारे दिवस आपण न्यूनगंडाच्या भावनेने जगले पाहिजे आणि आपल्यात जे उंच आहेत त्यांनी वाकले पाहिजे.” स्वयंशासित राष्ट्रातील देशामध्ये आढळून येणारी आत्मसन्मानाची भावना कोणत्याही भारतीयात आढळू शकत नाही. ज्या नेतिक बैठकीवर स्वराज्याची मागणी करण्यात आली ती कदाचित तुम्हाला पसंत पडणार नाही. इतकेच नव्हे तर एखाद्या सैतानाने धर्मग्रंथाचा उल्लेख करून आपले कार्य साधावे त्याप्रमाणेच हे सरंजामदार लोक स्वातंत्र्याची मागणी करीत असलेले पाहून तुम्हास वाटेल व क्षणभर मौजही वाटेल. लोकांच्या नेतिक सामर्थ्याकडे पाहिले तर ब्रिटिशांचे राज्य भारताला अतिशय महाग पडले, यात संशय नाही. हाही मुद्दा कदाचित तुम्हास पटणार नाही व तुम्ही म्हणाल की या देशात शांतता व सुरक्षितता राखण्याच्या बदलीत कोणतीही किंमत द्यावी लागली तरी ती कमीच होईल. परंतु मला वाटते, तुम्हाला पसंत पडेलच अशीही एक बाब आहे ती म्हणजे या देशातील लोकांचे दारिद्र्य! जगाच्या कोणत्याही भागात भारताची बरोबरी करू शकेल इतके दारिद्र्य आहे काय? १९ व्या शतकाच्या पहिल्या २५ वर्षामध्ये जेव्हा इंग्रजांचे राज्य ही एक मान्य वस्तुस्थिती ठरली तेव्हा अंदाजे दहा लक्ष लोकांचा जीव घेणारे पाच दुष्काळ पडले. दुसऱ्या २५ वर्षामध्ये दोन दुष्काळ पडले व त्यात अंदाजे चार लाख लोक मृत्युमुखी पडले. तिसऱ्या २५ वर्षामध्ये सहा दुष्काळ पडले आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नोंद पन्नास लक्ष झाली आणि या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षामध्ये आपणाला काय आढळून येते? अठरा दुष्काळ! आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा अंदाजे आकडा एक कोटी पन्नास लाख ते दोन कोटी साठ लाख!! आणि एकाच वर्षी सरकारच्या भिक्षागृहामध्ये ठेवण्यात आलेल्या साठ लाख लोकांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. सद्गृहस्थहो ! याचे कारण काय असले पाहिजे? याचे कारण स्पष्ट शब्दात सांगायचे म्हणजे या देशात ब्रिटिशांनी अवलंबिलेले सरकारी धोरण हेच होय. या देशातील व्यापार व कारखाने यांची वाढ खुंटविण्याचे नेहमीच उद्दिष्ट राहिलेले आहे. हा केवळ तर्कावर आधारलेला दोष नव्हे, तर भारताचे राज्य अशाप्रकारे चालवावे की भारत हा ब्रिटिश मालासाठी नेहमीचा गिऱ्हाईक राहिला पाहिजे, हे ब्रिटिशांच्या शासनाचे मान्य सूत्र होते. या धोरणामुळेच भारत हा युगानुयुगासाठी दरिद्री देश बनला. या दरिद्री बनविण्याच्या प्रगत क्रियेत मुख्यतः बळी पडणारे कोण होते ? दलितं वर्गाच्या ज्या शेतकरी लोकांना सहा महिने अजूनही भरपेट जेवण मिळत नसते तेच यामध्ये बहुसंख्येने बळी पडले असले पाहिजेत. त्यांच्या नित्याच्या दारिक्र्याने दुष्काळाला बळी पडण्यास त्यांची स्थिती अनुकूल होतीच व त्यामुळे , दुष्काळाला त्यांचाच मोठा घास मिळाला असला पाहिजे. हे जर तुमचे लोक