८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 258

२१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

असतील, त्यांच्याबद्दल जर तुम्हाला खराखुरा कळवळा असेल तर तुम्ही डोळे मिटून बसू शकत नाही किंवा या हृदयाचा थरकाप उडविणाऱ्या वस्तुस्थितीच्या बाबतीत उदासीन राहू शकत नाही. ARAA ! केवळ सुधारलेले रस्ते दिल्यामुळे, सुधारलेले कालवे बांधल्यामुळे, रेल्वे रस्त्यामुळे, पै-पैसा पोष्टाद्वारे पोचविल्यामुळे, सुस्थिर चलन आणल्यामुळे, भूगोलाच्या, खगोलशास्त्राच्या नव्या

कल्पना प्रसृत केल्यामुळे किंवा अंतर्गत भांडणे थांबविल्यामुळे ब्रिटिशांच्या नोकरशाही वर्गाची स्तुतीस्तोत्रे तुम्ही गात बसू शकत नाही. सुरक्षा आणि सुव्यवस्था सांभाळल्याबद्दल ते स्तुतीला पात्रही आहेत. परंतु सद्गृहस्थांनो | दलित वर्गासहित सर्व लोक काही सुरक्षा व सुव्यवस्था खाऊन जगत नाहीत तर भाकरीवर जगतात, हे आपण विसरता कामा नये. या जीवनाच्या कठोर कायद्यामुळे जे सरकार देशाची आर्थिक भरभराट करू शकेल व त्याद्वारा भौतिक जीवनात सुधारणा घडवून आणू शकेल अशा सरकारची मागणी दलित वर्गालाही करणे भाग आहे. लोकांच्या दारिद्र्याचे कारण उत्पादनातील कमतरता हे आहे आणि जे उत्पादन होते त्याचीही समान वाटणी होत नाही, असा मुद्दा तुमच्या- पैकी कोणी उपस्थित करील. मी हे प्रथमच मान्य करून टाकतो की या देशातील गरीब मजूर जनतेकडून बडे भांडवलदार व जमीनदार लोक जे पैसे बळजबरीने वसूल करतात त्याकडे लक्ष दिल्यास लोकांनी इंग्रजांची वर्षभर केलेली स्तुती एकदम फिक्की पडून जाते. तथापि, या पिळवणूक करणाऱ्या भांडवलदारांच्या व जमीनदारांच्या वरवंट्याखालून लोकांना ब्रिटिश सरकारने सोडवावे अशी अपेक्षा तरी तुम्ही कशी करू शकाल, हेच मला समजत नाही. एक गोष्ट आपण लक्षात ठेवलीच पाहिजे की प्रो. डायसी यांनी दर्शविल्याप्रमाणे कोणतेही सरकार-मग ते कितीही शक्तीशाली-असले तरी त्याला दोन गोष्टींची मर्यादा असते. पहिली मर्यादा आंतरिक असते व ती राज्यकत्यांच्या स्वभावावर, हेतूवर व हितसंबंधांवर अवलंबून असते, आणि ज्याअर्थी, ब्रिटिश सरकार भारतीय समाजात प्रचलित असलेल्या शक्तींना चालना देत नाही त्याअर्थी, तसे करणे हे त्यांच्या उद्दिष्टांच्या विरूद्ध आहे, हे होय. ते शिक्षणासंबंधी उदासीन असून स्वदेशीच्या विरूद्ध असण्याचे कारण म्हणजे, ते त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही, हे नव्हे तर तसे करणे हे त्यांच्या स्वभावाच्या, उद्दिष्टाच्या व हितसंबंधाच्या विरूद्ध आहे. राज्यकर्त्यावर ज्या दुसऱ्या बाबीचे बंधन असते ती बाब म्हणजे बाहेरून प्रतिकार होण्याची त्याला भीती वाटते. भारतीय समाजातील जीवनमूल्ये नष्ट करणाऱ्या सामाजिक दोषांचा गंभीरपणा इंग्रज राज्यकर्त्यांना माहीत नाही काय ? भारतातील जमीनदार