८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 262

२२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

म्हणून राहील. या दोघांनी परस्परांच्या सहकार्याने कार्य करावयाचे असेल तर या दोघांनाही एकाच अधिकाऱ्याकडून आज्ञा मिळावयास हव्या. प्रांतिक कार्यकारी मंडळ प्रांतिक विधानसभेला उत्तरदायी असल्यामुळे केन्द्रीय मंत्रिमंडळाच्या हुकुमांची अंमलबजावणी करण्यास ते बांधलेले राहणार नाही. कारण केन्द्रीय मंत्रिमंडळ या योजनेत केन्द्रीय विधानसभेला उत्तरदायी करण्यात आलेले नसून ते देशाच्या सेक्रेटरीला उत्तरदायी करण्यात आले आहे. आणि या बेबनावामध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत देशाचे शासन पूर्णतः दुर्बल ठरण्याचा संभव आहे. म्हणून, तुम्हाला पसंत असो की नसो, तुम्ही प्रांतिक मंत्रिमंडळाचे उत्तरदायित्व अशा स्थितीत केन्द्रीय मंत्रिमंडळावर सोपवू शकत नाही.

६. दलित वर्ग आणि असहकार .

२९. सदृंगृहस्थहो । आपण ज्याअर्थी, राखीव जागांसह साम्राज्यांतर्गत स्वराज्याच्या उद्दिष्टाला पाठिंबा देत आहोत, त्याअर्थी, महात्मा गांधींनी मागील मार्च महिन्यापासून या देशात जी असहकाराची चळचळ सुरू केली आहे तिच्यात भाग घेणे आपले कर्तव्य ठरते काय ? या प्रश्‍नाच्या बाबतीत तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली पाहिजे. सर्व उदारमतवादी लोकांनी ही चळवळ सनदशीर नसल्याबद्दल तिला दोष दिलेला आहे. हा युक्तिवाद मला पसंत नाही, हे मला कबूल केलेच पाहिजे. तुमची मंदीर प्रवेशाची चळवळ असनदशीर आहे, असे जर पुराणमतवादी लोक तुम्हाला म्हणतील तर तुम्ही काय उत्तर द्याल ? अशाप्रकारे सरळ कारवाई करण्यापेक्षा पुराणमतवादी लोकांना विनंती अर्ज करणे हे अधिक कायद्यात बसते की कायदा बदलून टाकण्याचा सरळसोट प्रयत्न करणे हे अधिक कायद्याच्या दृष्टीने बरोबर आहे ? पुराणमतवादी लोकांशी आरंभिलेल्या तुमच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये जर तुमच्या साधनांवर अशी कोणी बंधने घातली तर तुम्हाला बरे वाटेल काय ? मला वाटते की जर काही स्वीकृत घटनात्मक मार्ग आधी तयार असेल तरच तुम्ही सनदशीर मार्गाचा आग्रह धरू शकाल. परंतु जेथे अशा प्रकारची घटनाच नसेल तेथे सनदशीर मार्गाचा उपदेश ऐकण्यास फारच थोडे लोक तयार होतील. हा विचार ब्रिटिशांनासुद्धा नवीन नाही. कारण अल्स्टर चळवळ ही असहकाराचीच चळवळ नव्हती काय ? आणि ब्रिटिशांपैकी अनेक उत्तमोत्तम राजनीतिज्ञांनी तिला पाठिंबा दिला नव्हता काय ? आपल्या हितसंबंधाच्या दृष्टीने ती सुसंगत व समयोचित आहे की नाही हा प्रश्‍नच येथे महत्त्वाचा आहे. या असहकाराच्या चळवळीला मी विरोधी असण्याचे मुख्य कारण म्हणजे ती मुळीच समयोचित नाही, अशी माझी खात्री