डॉ. घाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २२४
अधिक दयाभाव हे तुम्ही सर्वजण जाणताच. स्पृश्यांच्या मनात अस्पृश्यांबद्दल
निर्माण व्हावा म्हणून महात्मा गांधींनी एका दिवसाचे तरी उपोषण केले आहे काय ? या गोष्टी जर करण्यात आल्या असत्या तर कोणीही काँग्रेसच्या व्यासपीठाचा स्वीकार केला असता. परंतु अस्पृश्यतेचा कलंक दूर करण्यासाठी काँग्रेसने काही प्रामाणिक प्रयत्न तर केले नाहीच पण स्वामी श्रद्धानंदांनी काँग्रेसचा त्याग केवळ एवढ्याच कारणाराठी केला की काँग्रेस याबाबतीत केवळ देखावा करण्यापलिकडे काहीच करावयास तयार नाही, हेही आपणास माहीत आहेच. काँग्रेसने घेतलेल्या ठरावावरून कोणाला तिचे अंतरंग ठरवावयाचे असल्यास काँग्रेस ही सामान्यांसाठी आहे की नाही हा निर्णय घेण्याची त्याने घाई
करता कामा नये. तिच्या आर्थिक ठरावांमध्ये उच्च वर्गाच्या व मध्यम वर्गाच्या हितसंबंधांचेच प्रतिबिंब दिसते. तिच्या व्यापारविषयक ठरावांचा संबंध केवळ व्यापारी व कारखानदार यांच्याशीच असून कामकरी माणसाला वगळण्यात आले आहे. जी संघटना केवळ एक चतुर्थांश किंवा एक शष्ठमांश इतक्याच लोकांचे काम करते आहे तिने आपण जनतेची प्रातिनिधीक संघटना असल्याचा दावा करणे
सोडून दिले पाहिजे. मिठाच्या सत्याग्रहाचा समावेश काँग्रेसच्या कार्यक्रमात
घातल्यामुळे तिचा हा मूळ चेहरा पालटून जात नाही. मिठावरील कराविरूद्ध चालू असलेली जोरजोराची निदा ही राजकीय चळवळीचा एक भाग आहे. परंतु
Rear चव जशी खाऊन पाहिल्यावाचून कळत नाही त्याप्रमाणेच मिठाच्या
सत्याग्रहाची चळवळ सामान्य जनता कुचलल्या जाऊ नये म्हणून उत्त्चवर्गाच्या खांद्यावर कितपत देण्यात येईल, त्यावर या चळवळीची चव अवलंबून आहे. तिच्या मागचा प्रामाणिक हेतू केवळ काळच स्पष्ट करू शकेल. परंतु जेव्हा निर्णयाची वेळ येते तेव्हा अनेक काँग्रेसवाले सामान्य लोकांची बाजू घेण्याऐवजी .उच्च वर्ीयांचीच बाजू घेतात, याबद्दल मला मुळीच शंका नाही. काँग्रेस सामान्य जनतेबद्दल उदासीन व निष्काळजी असावी हे एकप्रकारे अनिवार्यच आहे. कारण ती राष्ट्रवादी लोकांचे प्रतिनिधीत्व करीत असून ती काही एखादा राजकीय पक्ष नव्हे. त्यामुळे तिचे धोरण व कार्यक्रम ऐसपैस असलेच पाहिजे. प्रत्येकाला हे माहितच आहे की एखाद्या संघटनेवर सर्वांच्या हितसंबंधाची अनेकविध जबाबदारी लादण्यात आली तर सर्वांच्या नावावर ती केवळ काहिचेच हित साधू शकते आणि हितसंबंधामध्ये जर काही विरोध निर्माण झाला तर दुर्बल लोकांना वाऱ्यावर सोडण्यात येते. म्हणून आपल्या कार्याची जबाबदारी काँग्रेसने सांभाळावी आणि ज्याअर्थी, अशाप्रकारचा विरोध आमच्या प्रतिपक्षांशी उद्भवणार हे निश्चित आहे; त्याअर्थी, त्या परिस्थितीत आमची बाजू घेऊन तिने आमच्यासाठी लढावे अशी अपेक्षा तरी आपण कशी करू शकू, हेच मला कळत नाही.