एकसंध भारत आमचे ध्येय आहे २२५
३३. आपणापैकी काँग्रेसची सेवा करण्यास जे आतुर आहेत त्यांचा असा समज आहे की स्वराज्य प्राप्तीनंतर या सेवेचा मोबदला म्हणून काँग्रेस आमची अस्पृश्यता नष्ट करील व आपण जर तिची आता सेवा केली नाही तर या गुन्ह्याबद्दल ती नंतर आम्हाला गुलामगिरीत डांबील. फुकटच्या मदतीबद्दल कोणी मोबदला देत नाही व त्यामुळे वरील मतावर मला माझा अभिप्राय देण्याची गरज दिसत नाही. परंतु एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे मला वाटते. ती म्हणजे आता तुम्ही कॉंग्रेसची कितीही सेवा करा परंतु स्वराज्य प्राप्तीनंतर या काँग्रेसचा तुम्हाला शोधूनही पत्ता लागणार नाही. त्यावेळी आपणाला. आपल्याच शक्तीवर विसंबून राहावे लागेल. कारण काँग्रेसचे ध्येय साध्य झाल्यामुळे स्वराज्याच्या आगमनाबरोबरच ती हवेमध्ये विरून जाईल. आणि हँमिल्टनच्या शब्दात सांगायचे म्हणजे आपणाला येथील जनतारूपी ' भयानक पशूच्या ' gel व खवळलेल्या वासनांशीच दोन हात करावे लागणार आहेत. मला तर अशीही भीती वाटते की, ज्यांच्या नावाने आपले सर्व प्रयत्न सोडून देण्यात यावे असे सांगण्यात येते त्या महात्मा गांधींना जर सामान्य माणसाला जीवन मिळते त्यापेक्षा अधिक काळ जीवन-निसर्गाचे नियम तोडून लाभले व ते स्वराज्याच्या काळात जिवंत राहिले तर ते सुद्धा या ' भयानक पशूपासून ' आपले रक्षण करण्यास असमर्थच ठरतील.
` ३४. माझा विचार बरोबर असेल तर स्वतःसाठी आपला मार्ग ठरविला पाहिजे, असाच त्यावरून निष्कर्ष निघतो. अशाप्रकारच्या मार्गाचा अवलंब करण्यास जे कचरत आहेत त्यांच्या घाबरेपणाचा हेतू मी समजू शकतो. काँग्रेस आणि सरकार या दोघांपेक्षाही वेगळी अशी भूमिका घेण्यात त्यांना धोका होण्याची शंका येते. ही आपल्या दुर्बलपणाची कबुलीच आहे; आणि दलित वर्गाने शासन- शक्तीच्या आधारावाचून स्वतंत्र भूमिका घ्यावी, ही परिस्थिती काही सुखावह नाही, हे मला कबूल आहे, परंतु मला तुम्हास असे विचारावेसे वाटते की सरकार किंवा काँग्रेस या दोघांपैकी कोणावरही विसंबून राहण्यामुळे आपला काय लाभ होईल ? केवळ एखादा पक्ष शक्तीशाली आहे म्हणून, आपली तेथे कदर होवो की न होवो, त्याच्याशी संगनमत करणे हा भिकाऱ्यांचा मार्ग असून ती लज्जास्पद शरणागती आहे आणि कोणतेही सभ्य लोक तो सहन करू शकत नाहीत. इतरांनी लक्षात घ्यावी अशी शक्ती दलित वर्गाने कशी प्राप्त करून घ्यावी व अशा [तऱहेने ] या प्रसंगातून आपले कल्याण कसे साधून घ्यावे हाच खरा [त्यांच्यापुढील ] [प्रश्न ] आहे. दलित वर्गाच्या चळवळीत दोन गंभीर [गोष्टींची ] [उणीव ] [आहे ] [असे ] दिसते. पहिली बाब म्हणजे दलित वर्गाचे लोकमत अशी [काही ] [एक ] [वस्तू ] [दिसत ] नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे [सर्व ] [दलित ] [वर्गाने ] [मिळून ] [सल्लामसलत ] [करून ]