डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २२६
आपली दुःखे निश्चित केलेली अशी कोणतीही साधने त्यांच्याकडे नाहीत.
जशीच्या तशीच राहिली याचे कारण, आपण युगानुयुगे मुके राहिलो आणि त्याला वाट करून देण्याची काळजी घेतली नाही, हेच आहे, असे दिसते. न्यायाच्या दृष्टीने पाहिले तर आपल्या स्थितीबद्दल आपण सरकारला किंवा सुधारकांनाही दोष देऊ शकत नाही. आपण जाणूनबुजून या अवस्थेत स्वतःला ठेवले आणि त्यांना आपल्या दुःखाबद्दल कसलीही जाणीव करून न देता किवा त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा न देता त्यांच्या नावाने उगीचच खडे फोडत आहोत, हे कबूल केलेच पाहिजे. आपल्या सभांमध्ये आपण पास केलेले ठराव, आपण सरकारकडे केलेल्या मागण्या व आपल्या तक्रारीचा सरकारकडून इतर जमातींच्या मागण्याप्रमाणेच गंभीरपणे विचार का होत नाही, याचा चिंतातुरपणे मी विचार करीत आलो आहे. त्यावरून माझी खात्री पटली आहे की आपण अजूनही केवळ एखाद्या प्रांतापुरतीच चळवळ उभारू शकतो. एका प्रांतात उभारलेल्या चळवळीला दुसऱ्या प्रांतात पाठिंबा मिळत नाही. परंतु अशी चळवळ जर संपूर्ण देशाच्या मध्यवर्ती संघटनेने उभारली तर तिला निश्चितच सर्व प्रांतांचा पाठिंबा मिळाला असता. मला वाटते दलित वर्गाने याबाबतीत जागृत व्हावे व अखिल भारतीय स्वरूपाची एक संघटना उभारून तिच्या द्वारा आपली सुनिश्चित चळवळ चालवावी यासाठी आता सर्वात नामी संधी लाभलेली आहे. मागील दोन-तीन वर्षापासून ' ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास असोसिएशन ' नावात्री एक संस्था अस्तित्वात आली आहे. परंतु या संस्थेचे केवळ पदाधिकारी असून तिच्याजवळ इतर सभासद मुळीच नाहीत. हे एक उघड गुपित आहे. माझ्या प्रांतातील तिची स्थिती तर निश्चितच अशी आहे. अशाप्रकारची खोटी कल्पनेतील संस्था दलित वर्गाची कोणतीही सेवा करू शकत नाही. तुम्हाला खरीखुरी जिवंत संस्था उभारली पाहिजे व तिच्या कार्यकर्त्यांचे जाळे देशभर पसरून व अनेक कार्यकर्ते तिच्या भोवती गोळा करून तिच्या द्वारा तुम्हाला दलित वर्गाच्या भावना
व्यक्त केल्या पाहिजे. मी सागितल्याप्रमाणे असे एखादे संघटन उभारण्याच्या हेतूने या सभेतच एक घटना तरार करण्यासाठी तुम्ही एखादी लहानशी कमिटी नियुक्त केली तर फार सोईचे होल. ही आपणात फार मोठी उणीव असून ती आपण अविलंब भरून काढली पाहिजे.
८. दलित वर्गाची उन्नती
३५. सद्गृहस्थांनो | आपण राजकीय सत्ता हस्तगत केली पाहिजे, याबद्दल वाजवीपेक्षा बराच वेळपर्यंत बोलून मी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगितले. परंतु दलित वर्गाच्या सर्व रोगावर राजकीय सत्ता हे औषध लागू होऊ शकत नाही, हेही मी तुम्हास सांगितलेच पाहिजे. त्यांची मुक्ती सामाजिक उन्नतीमध्ये आहे. दलित वर्गाने आपल्या वाईट चालीरितींचा त्याग केला पाहिजे.