८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 270

३४

देशाच्या स्वराज्यास माझा [पाठिंबा ] [असेल ]

“ दिनांक ४ ऑक्टोबर १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी इंग्लंडला जात असल्याने दिनांक २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई इलाख्यातील अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र व थैली अर्पण करण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या भव्य पटांगणात सायंकाळी ४ वाजता डॉ. सोळंकी यांचे अध्यक्षतेखाली झाला. समारंभास सुमार ६/७ हजार जनसमूह जमला होता.

अध्यक्षांनी प्रास्ताविक भाषण केल्यानंतर समारंभ कमिटीचे जनरल सेक्रटरी श्री. सीताराम नामदेव शिवतरकर यांनी मानपत्र वाचून दाखविले व थेलीसाठी रु. ३.७०० जमले असून दुसरे दिवशी संध्याकाळपर्यंत सदर थैलीची रक्कम पाच हजार रुपयांपर्यंत जाईल अशी आशा त्यांनी प्रदर्शित केली,” * मानपत्र

येणेप्रमाणे :

मानपत्र

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, एम. ए., पीएच. डी., डी. एस्सी ye tee,

एम. एल. सी.

परमप्रिय महाराज, हिंदुस्थानला ग्रेटब्रिटनने स्वराज्याचे इक्क देण्याच बाबतीत वाटाघाट करण्याकरता लंडन येथ भरणाऱ्या VHS टेबल करना हजर राहण्यासाठी सरकारच्या निमंत्रणावरून आपण तिकडे जाण्यास निघतं आहा, अशा वेळी आपल्या संबंधाने आमच्या दलितवगांमध्ये वाटत असलेला उत्कट आदर, विश्वास व प्रेम ही व्यक्त करणे हे आमचे पवित्र कर्तव्य आहे असे आम्ही समजतो. आपण संपादन केलेल्या प्रशंसनीय ज्ञानाचा व अनुभवाचा सदुपयोग स्वदेशाच्या व विशेषतः स्वकीय जनांच्या हितार्थ करण्याचा हा असा सुयोग आल्याबद्दल आम्ही आपले अंत:क शपूर्वक अभिनंदन करतो.

विद्वत्रत्य महाशय, समाजशःर.!, राजनीतिशास्त्र, अर्थशास्त्र, इत्यादी गहन विषयांचे दीर्घकाळ अध्ययन करून तदतर्गत प्रमेयांचे यथोचित मनन आपण केले आहे. त्याचा पडताळा व्यवहारात पाहाण्याचे अनेक प्रसंग आपणास स्वदेशी व परदेशी प्राप्त झाले आहेत. आणि आमच्या देशाच्या उन्नतीस कोणत्या गोष्टींची सांप्रतकाळी आवश्यकता आहे, हे आपण आपल्या मनाशी ठरविले आहेच.

* डॉ. बाबासाहेब आबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ४, पृ. ६६