२-१०-१९३० देशाच्या स्वराज्यास माझा पाठिंबा असेल - Page 273

देशाच्या स्वराज्यास माझा पाठिबा असेल २३१

सुशिक्षित असल्याने कौन्सिलमध्ये आमचे जमेल. मी थोडासा उद्धट व रागीट असा आहे. कौन्सिलमध्ये असताना डॉ. सोळंकी यांच्याशी वागताना तसे दोष मजकडून घडले असतील. परंतु डॉ. सोळंकींनी मनात काहीएक न बाळगता मनोभावाने मदत केली आहे व म्हणून कौन्सिलच्या सर्व कामाचे श्रेय डॉ. सोळंकी यांनाच आहे. कौन्सिल बाहेरच्या गोष्टीत समता संघाने मला फार मदत केली आहे. श्री. देवराव नाईक यांनी आजपर्यंत मला केलेल्या मदतीवरून मी त्यांना माझा उजवा हात मानतो. मला खात्री आहे की, जरी मी ५/६ महिन्यांसाठी परदेशात जात असलो, तरी आमच्या एकमेकांच्या सहवासाने आमचे इतके तादात्म्य झाले आहे की, माझ्या मागे श्रीयुत नाईकच काम करू शकतील. दुसरे माझे समता संघाचे स्नेही श्रीयुत प्रधान, कद्रेकर, कवळी इ. मंडळींनी बरीच मदत केली आहे. तसेच श्री. शंकरराव परशा यांनी पैशाच्या बाबतीत फारच मदत केली आहे. श्री. शंकररावसारखा आधारस्तंभ दुसरा मला कोणीच नव्हता. सार्वजनिक कार्याला पैसा आवश्यक असतो परंतु सुरवातीस मी काढलेल्या सोलापूर बोर्डिंगच्या वेळी मजजवळ फक्त रु. ५०० हातात होते. नंतर एका ज्यू मित्रास रु. १,००० ची प्रॉमिसरी नोट लिहून देऊन या बोर्डीग संस्था सुरू केल्या आहेत. त्यात श्री. शंकररावांनी फारच मदत केली आहे. प्रेस घेण्यासाठी त्यांनी रु. १,८०० ची मदत केली आहे.

आजपर्यंत अस्पृश्यवर्गासाठी जी थोडीबहुत कामगिरी मजकडून झाली आहे, तिच्या श्रेयाचे अनेक लोक वेगवेगळ्या कामातले सहकारी भागिदार आहेत. आपण दिलेली थैली व मानपत्र मी स्वीकारतो परंतु थैलीतल्या रकमेचा आपल्या खाजगी कामाकरिता मुळीच उपयोग करावयाचा नसून, ज्या गरीब समाजाकडून ही थैलीची रक्‍कम जमा झाली आहे, त्याच गरीब जनतेच्या कार्यात तिचा उपयोग' होणे इष्ट आहे. अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या मध्यवर्ती संघटनेच्या खर्चाकरिता मुंबई इलाख्यातफे वर्गणी जमवून देण्याचे मी कबूल केले आहे. त्याकरिता सदरील रकमेचा काही भाग डॉ. सोळंकी यांचेजवळ ठेवून जाणार आहे. बहिष्कृत काँग्रेसकरिता त्यांनी सदर रकमेचा उपयोग करावा. बाकीच्या रकमेचा दुसऱ्या तऱ्हेने उपयोग करणार आहे. आपले बंद पडलेले बहिष्कृत भारत पत्र पुनः सुरू करावे अशी इच्छा आहे. सकद्यःस्थितीचे निरीक्षण करून त्यावरील लेख सदर पत्रात येतील. पत्राचे नाव बदलण्याचा मी निश्चय केला आहे. कारण नावामुळे बरेच लोक आपले पत्र घेत नसत व आपले म्हणणे काय आहे हे सर्वाना समजावे हा जो आपला उद्देश तो साधला जात नसे. त्यासाठी नाव बदलण्याचे मी ठरविले आहे. पत्राचे नाव ' जनता ' ठेवून त्याचे संपादकत्व श्री. देवराव नाईक यांच्याकडे राहील. सदर पत्रास वर्गणीदार मिळवून देण्याची कृपा करावी, थेलीच्या रकमेतील काही भाग मी चालविलेल्या