आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २३२
विनियोग केला बोर्डीगांना मदत म्हणून द्यावा. याप्रमाणे थेलीच्या पैशाचा
जाईल. ' राऊंडटेबल कॉन्फरन्ससाठी विलायतेस जाण्यायेण्याचा
मग ही थैली डॉ. आंबेडकरांचा खर्च जर इंग्रज सरकार देणार आहे. तर कशासाठी ? ' असे आपल्यापैकी काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे ; परंतु ज्यावेळी मला आपल्या मदतीची जरूरी होती त्यावेळीसुद्धा जेथे मी आपल्या मदतीची अपेक्षा केली नाही त्या मला आज माझ्या खाजगी कार्यासाठी तुमच्या मदतीची जरूरी नाही. जेव्हा जरूर लागेल त्यावेळी मी अवश्य मदत मागेन.
मी राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार आहे. या परिषदेपासून निदान अस्पृश्य वर्गाचा तरी फायदा झाल्याशिवाय राहाणार नाही. परंतु ज्या लोकांनी या परिषदेवर बहिष्कार घातला आहे, अशा लोकांना मी असे विचारतो की, जर दोन पक्षात लढाई जुंपली तर तहाची भाषा बोलणे काय वाईट ? आज सरकार व काँग्रेस यांच्यामध्ये निकराचा लढा चालू आहे. काँग्रेसच्या चळवळीमुळे सरकारचे नुकसान होते. असले दोन्ही पक्ष हट्टास पेटले असता कोणी तरी मध्यस्थी करून तडजोडीचा मार्ग काढून भांडण मिटविणे अवश्य आहे. हा
तडजोडीचा मार्ग राऊंड टेबल कॉन्फरन्सद्दारे निघू शकेल. या परिषदेपासून
काही निष्पन्न होणार नाही असे सांगण्यात येत आहे परंतु मला तसे वाटत
नाही. ज्यांना ही परिषद अपेशी वाटत असेल, त्यांना मी असे विचारतो की, या
परिषदेस अपेश कसे व का येईल ? सध्या हिंदू मुसलमान व अस्पृश्य या सर्वांना स्वराज्य असावयास पाहिजे आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल
भारतीय बहिष्कृत काँग्रेसने तसा ठरावही पास केला आहे. सर्वाची एकवाक्यता आहे. मतभेद एकाच गोष्टीवर आहे व ती ही की, ' स्वराज्य कोणत्या पद्धतीवर द्यावयाचे !' अल्पसंख्यांक लोकांचे संरक्षण होऊन त्यांना कोणत्या परीने सामाजिक, धार्मिक, राजकीय समता मिळेल, सर्व हिंदू मात्र स्वतंत्र असू शकतील असे स्वराज्य आज हवे आहे ; परंतु वाद आहे तो स्वराज्याने मिळणारी सत्ता सर्व
समाजामध्ये योग्यरीतीने विभागली जावी की एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हातीच ती राहावी या संबंधाने आहे. दलित समाज, मागासलेले वर्ग व अल्पसंख्यांक वर्ग यांचे समाधान करण्याच्या कामी पुढारलेल्या वर्गाने व बहुसंख्यांक समाजांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला तर आपसातला वाद मिटणे अशक्य नाही.
आपल्याला आवश्यक ते मागेनच ; परंतु त्याचबरोबर या देशास स्वराज्य द्यावे असा ठराव आल्यास त्यास मी पाठिबा देणार आहे. या देशाची सर्वतऱ्हेने उन्नती होऊन हा देश उच्च पदास चढावा हे काँग्रेसप्रमाणे आम्हासही वाटते. शेवटी मी राऊंड टेंबल कॉन्फरन्स आटोपल्यानंतर दुसरे काम करु इच्छितो व ते हे की. लोकमत जागृत करणे. हे फार महत्त्वाचे काम आहे. काँग्रेसची चळवळ