ब्रिटिश सरकार ...... सत्ता येणे शक्य नाही २३५
आणि मानवाचे अस्तित्वच ज्यावर आधारित आहे अशा प्राथमिक स्वरूपाच्या नागरिक हक्कांपासूनच या वर्गांना वंचित ठेवण्यात आले आहे. मला खात्री आहे की, इंग्लंड किंवा फ्रान्सच्या संपूर्ण लोकसंख्येइतक्या असलेल्या लोकांची जीवन कलहामध्ये इतक्या भयंकरपणे अनेक विघ्नांनी जखडबंदी झाली आहे की, राजकीय समस्या सोडविण्याच्या योग्य मार्गावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहू शकत नाही, ह्या परिषदेने हा प्रश्न शक्य तितक्या लवकर सोडविण्याची जबाबदारी स्वीकारावी अशी माझी कळकळीची अपेक्षा आहे.
शक्य तितके थोडक्यात हा प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मला सांगावयाचे ते हे की, शक्य तितक्या लवकर भारतातील प्रचलित नोकरशाही रद्द करून लोकांचे, लोकांनी व लोकांकरता चालविलेले सरकार स्थापन करण्यात यावे. माझी खात्री आहे की, दलित वर्गाच्या दृष्टिकोनातून या माझ्या विधानाबाबत काही लोकांना खचितच आश्चर्य वाटेल. कारण दलित वर्गाला ब्रिटिश शासकांशी जोडणारा धागा अतिशय वेगळ्या स्वरूपाचा आहे. धर्माध हिंदुंनी दलितांचे पिढ्यान् पिढ्या जे दमन केले व त्यांच्यावर अत्याचार केले त्यापासून आंशिक सुटका मिळवून देणारे मुक्तिदाता या दृष्टीने त्यांनी ब्रिटिशांचे स्वागतच केले. इंग्रजांच्या बाजूने त्यांनी हिंदू, मुसलमान व शीख यांच्याविरूद्ध युद्धात भाग घेऊन भारताचे साम्राज्य त्यांना जिकून दिले. या बदल्यात दलितांचे विश्वस्त म्हणून आपली भूमिका सांभाळण्याचे आश्वासनही ब्रिटिशांनी दिले होते. अशातऱहेचा ह्या दोहोंमधील घनिष्ट संबंध लक्षात घेतला म्हणजे, ब्रिटिश सरकारविषयी दलित वर्गाच्या मनात हे जे परिवर्तन घडून आले आहे ही घटना निशंकपणे लक्षणीय म्हणावी लागेल. परंतु ह्या मतपरिवर्तनाची कारणे शोधून काढणे फारसे अवघड नाही. केवळ बहुमताच्या हातात आपले भविष्य झोकून द्यावे एवढ्याच इच्छेने आम्ही हा निर्णय घेतलेला नाही. खरेच! तुम्हाला माहितच आहे की, भारतातील बहुमत आणि मी ज्या अल्पमताचा प्रतिनिधी आहे त्यांच्यात सलोख्याचे संबंध तसे कधीच नव्हते. आम्ही हा निर्णय स्वतंत्रपणे घेतलेला आहे. केवळ आमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीच्या प्रकाशात वर्तमान शासनाचे परिक्षण केले आणि चांगल्या शासनास आवश्यक असलेली बहुतेक मूलतत्त्वे ह्या शासन प्रणालीत नाहीत असे आम्हास आढळले आहे. आमची सद्य परिस्थिती आणि ब्रिटिश राज्याच्या पूर्वीचा भारतीय समाज यांची तुलना करता असे दिसून येते की, पूर्वीच्या समाजात आमच्या वाट्याला जी दुर्दैवी स्थिती आली होती तिच्यातून आम्ही पुढे वाटचाल करण्याऐवजी केवळ कालक्रमणा मात्र करीत आहोत. ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी अस्पृश्यतेमुळे आम्ही अती किळसवाण्या रिथतीत दिवस कंठीत होतो. ही परिस्थिती दूर करण्यासाठी ब्रिटिश सरकारने काही केले आहे काय ? ' ब्रिटिश येण्यापूर्वी खेड्यांतील विहिरींवर आम्हाला