२०-११-१९३० ब्रिटिश सरकार जोपर्यंत या देशात आहे, आमच्या हातात राजकीय सत्ता येणे शक्य नाही - Page 278

२३६ डॉ. वाबासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे

पाणी भरण्यास बंदी होती. विहिरींवर पाणी भरण्याचा अधिकार ब्रिटीश सरकारने मिळवून दिला काय ? * ब्रिटिश येण्यापूर्वी आम्ही देवळात जाऊ शकत नव्हतो. आता आम्ही जाऊ शकतो काय ? ब्रिटिश येण्यापूर्वी आम्हाला पोलिस दलात प्रवेश नाकारण्यात येत होता. आतातरी ब्रिटिश सरकार आम्हाला पोलिस दलात प्रवेश देते काय ? ब्रिटिश येण्यापूर्वी आम्हाला सैन्यात नोकरी नाकारण्यात येत होती. सरकार सैन्यात नोकरी करण्याची आम्हाला आता परवानगी देते काय ? हे क्षेत्र आम्हाला आज खुले आहे काय ? ह्या प्रश्‍नां- पैकी कोणत्याही प्रश्‍नाला आपण होकारार्थी उत्तर देऊ शकत नाही. इतक्या मोठ्या काळापर्यंत ज्यांनी राज्यसत्ता चालविली ते इंग्रज होत म्हणूनच. त्यांनी आमंच्यासाठी काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेत हे मी मोठ्या आनंदानें कबूल करतो. परंतु आमच्या स्थितीत मूलभूत असे कोणतेही परिवर्तन त्यांनी घडवून आणले नाही. खरच ! ज्या बाबतीत आमचा संबंध आहे त्या बाबतीत ब्रिटिश सरकारने त्यांना जी समाजव्यवस्था आढळून आली तिचेच त्याने मोठ्या विश्वासूपणाने रक्षण केले. एका चिनी शिष्याला नमूना म्हणून एक जुना कोट देण्यात आला असता त्याने ज्याप्रमाणे मोठ्या अभिमानाने नवीन कोट करताना त्यावर चिरा व छिद्रे पाडली व जुन्याबरहुकूम नवा कोट केला. त्याप्रमाणेच ब्रिटिश सरकारने या बाबतीत वर्तन केले आहे. जरी ब्रिटिशांनी दीडशे वर्षेपर्यंत या देशावर राज्य केले तरी उघड्या व्रणांप्रमाणे आमची दुःखे तशीच राहिली आहेत. त्यांच्यावर काहीच उपचार करण्यात आले नाहीत |

बिटिशांनी आमच्याविषयी सहानुभूती दाखविली नाही किंवा ते आमच्या स्थितीसंबंधी उदासीन राहिले म्हणून आम्ही त्यांना दोष देत आहो, असे मात्र नव्हे, तर आम्हास असे आढळून आले की, आमचे प्रश्‍न हाताळण्यास ते पूर्णत: अकार्यक्षम आहेत. केवळ उदासीनतेसंबंधीचाच प्रश्‍न असता तर तो तत्कालिक स्वरूपाचा आहे असे म्हणता आले असते आणि त्याने आमच्या मतांमध्ये इतका गंभीर स्वरूपाचा बदल झाला नसता. परंतु परिस्थितीचे खोलवर पृथःकरण करून पाहिल्यानंतर असे आमच्या लक्षात आले की, हे प्रकरण केवळ उदासीनतेचे नाही, तर प्राप्त कर्तव्य समजून घेण्याच्या पूर्णतः असलेल्या अकार्यक्षमतेमुळेच असे. घडून आले आहे. भारतातील ब्रिटिश सरकारवर दोन गंभीर स्वरुपाची बंधने आहेत असे दलित वर्गास वाटते. पहिले बंधन हे अंतस्थ स्वरूपाचे होय. जे आज अधिकारपदावर आहेत त्यांची भूमिका, त्यांचे हितसंबंध आणि त्यांच्या प्रेरणा यांच्यामुळे निर्माण झाले आहे. ब्रिटिश सरकार आम्हाला ह्या

* प्रस्तुत वाक्य-डॉ. आंबेडकर : लाईफ अँड मिशन : धनंजर कीर, पृ. १५०