ब्रिटिश सरकार ,..... सत्ता येणे शक्य नाही २३७
प्रश्नामध्ये मदत करू शकत नाही म्हणून नव्हे तर असे केल्यास त्यांची भूमिका त्यांचे हितसंबंध, त्यांच्या प्रेरणा, त्यांच्याशी न जुळणारे असल्यामुळे ते आम्हास मदत करू शकत नाहीत. त्यांच्या अधिकारावर दुसरे भयंकर स्वरूपाचे बंधन म्हणजे असे काही पाऊल उचलल्यास ह्याला हिंदुसमाजाकडून तीव्र प्रतिकार होईल अशी त्यांना भीती वाटते. भारतीय समाजाच्या मर्मस्थानी इजा करणारे सामाजिक दोष काढून टाकणे अत्यावश्यक आहे हे इंग्रज सरकारने ओळखले आहे. ह्या दोषांमुळे दलित वर्गाच्या जीवनाला हजारो वर्षापासून भयानक स्वरूपाची कीड लागली आहे, हेही त्यांना माहीत आहे. भारतातील जमीनदार बहुजनांची क्रूर पिळवणूक करून त्यांना दिवसेनूदिवस शुष्क करीत आहेत. तसेच भांडवलदार मजूर वर्गाला जगण्यासाठी आवश्यक तेवढी मजूरी आणि त्यांना कामाच्या उपलब्ध सोयी प्राप्त होऊ देत नाहीत, ह्याचीही जाणीव भारतीय सरकारला आहे. तरी सुद्धा ह्यापैकी एकाही दुष्ट रूढीला हात घालण्याचे धाडस भारत सरकारने केलेले नाही, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. का? त्यांना असे करण्यासाठी कायदेशीर अधिकार नाहीत म्हणून त्यांनी असे केले आहे काय ? नाही. त्यांनी अशातऱहेची मध्यस्थी केली नाही, कारण अशातऱहेच्या सामाजिक व आर्थिक जीवनाच्या प्रचलित संहितेला धक्का लावल्यास हितसंबंधी वर्गाकडून त्याला प्रखर विरोध केल्या जाईल अशी त्यांना भीती वाटत होती. अशा सरकारपासून कोणाचे कोणते कल्याण होणार ! या दोन निर्बंधांनी पांगळ्या झालेल्या सरकारकडून लोकांच्या जास्तीत जास्त कल्याणाची एवढीच अपेक्षा करता येण्यासारखी आहे की, भारतातील सामाजिक परिस्थिती पूर्ववतच राहावी. आम्हाला असे सरकार अधिकारावर हवे की, ज्यातील सत्ताधारी व्यक्तिची बांधिलकी देशाच्या सर्वोच्च हितासाठी असेल. प्रचलित सामाजिक आणि आर्थिक रूढी सुधारण्याचा प्रयत्न केल्यास लोकांची आज्ञापालनाची । वृत्ती केव्हा नष्ट होते आणि बंड करून उठण्याची प्रवृत्ती केव्हा उफाळून येते याची सीमारेषा ओळखणारे व निर्भयपणे सुधारणा करण्यास पुढे येणारे सरकार आम्हाला हवे आहे कारण अशा ठिकाणीच न्यायप्रियता आणि उपयुक्तता सिद्ध होत असते. ही कर्तव्ये पार पाडण्यास ब्रिटिश सरकार कधीही पात्र ठरू शकत नाही. हे केवळ लोकांचे, लोकांनी व लोकांकरिता चालविलेल्या सरकारलाच शक्य होऊ शकते.
दलित वर्गाने त्यांच्या दृष्टिकोनातून उपस्थित केलेले काही प्रश्न व त्यांची संभवनीय उत्तरे ही अशी आहेत. म्हणून आम्ही ह्या टाळता न येणाऱ्या अशा निर्णयावर येऊन पोहोचलो आहोत की, आमच्या सध्याच्या वैशिष्ट्यपूर्ण संकटग्रस्त स्थितीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने जरी उद्दिष्ट चांगले असले तरी सध्याचे नोकरशाही भारत सरकार पूर्णतः सामर्थ्यहीन आहे. आमची दुःखे