डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अमोघ पक्तृत्वाने या देशात सर्वकष क्रांती घडवून आणली. भारतीय समाजाचे असे एकही अंग नाही की ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही. या सर्वकष क्रांतीसाठी त्यांनी जी आयुधे वापरली त्यामध्ये त्यांची ओजस्वी वाणी या अत्यंत प्रभावशाली आयुधाचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यामुळेच भारतीय समाजाला क्रांतीसन्मुख होणे भाग पडले ही वास्तवता कोणालाही नाकारता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे _ देशातील तळागाळातील लोकांच्या मनात ज्वलंत स्वाभिमानाची भावना निर्माण करून जीवनाकडे पाहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांनी संपूर्णतया बदलवला. जुन्या परंपरागत विचारांचा, चालिरितींचा लाखो लोकांनी एका क्षणात त्याग केला, माणूस स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आहे, माझे जीवन मी कोणावर सोपवणार नाही, ते मी स्वतः घडवणार आहे ही भावना दलितांच्या मनात निर्माण झाली तो केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांचा परिणाम होय. एका माणसानी आपल्या भाषणांच्या द्वारे असंख्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. ही किमया केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच करू शकले. जगाच्या आजवरच्या इतिहासात अशी घटना ' न भूतो न भविष्यति' म्हणावी लागेल.
त्यांच्या भाषणांनी देशातील तळागाळातील शोषितांचे जीवन उजळून निघाले. त्यांच्या जीवनाला मान्यता मिळाली. त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली.
एके ठिकाणी लॉर्ड माऊंटबॅटननी बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन एक धाडसी योद्धा (Brave Fighter) असे केले आहे, ते यथार्थ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात एक घनघोर असा संग्राम केला त्यातूनच आधुनिक भारताची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. | |
इटलीतील मॅझीनीच्या, विचार अमर असतात या विधानावर स्वत:ची प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विचार सुद्धा मर्त्य आहेत. ज्याप्रमाणे रोपट्यांना पाण्याची आवश्यकता असते अन्यथा त्याच्या
- विना ते करपून जातात. त्याचप्रमाणे विचारांना सुद्धा प्रचार व प्रसाराची ' नितांत आवश्यकता आहे. अन्यथा प्रचार व प्रसाराअभावी ते नष्ट होतील. ` डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैशिष्ट्य असे की ते केवळ मूलभूत विचार देऊनच थांबले नाहीत, त्या विचारांच्या रोपट्यांना त्यांनी स्वतःच्या भाषणांच्या माध्यमातून असंख्य लोकांपुढे ठेवून, त्यांच्या मनात ते विचार रुजवून, ते चिरकाल टिकतील अशी तजविज करून ठेवली आहे. आज असंख्य लोक त्यांच्या विचारांना स्वतःचा जीवनमार्ग समजून आपले जीवन घडवित आहेत. राष्ट्र उभारणीसाठीही
(चोवीस)