ब्रिटिश सरकार . ..... सत्ता येणे शक्य नाही २४१
चर्चेला आलेल्या दुसऱ्या प्रश्नासंबंधी बोलायचे म्हणजे मला मोठ्या खेदाने असे म्हणावेसे वाटते की, हा प्रश्न उगीचच परिषदेतील ह्या सर्वसामान्य चर्चेशी जोडला आहे. त्याची चर्चा परिषदेच्या एका स्वतंत्र सत्रात व्हावी इतके त्याचे महत्त्व आहे. केवळ ओझरता उल्लेख केल्याने त्या प्रश्नाला न्याय मिळू शकत नाही. हा प्रश्न दलितांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने तो महत्त्वाचा आहे. अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधी या नात्याने आमची केंद्र शासनाकडून ही अपेक्षा आहे की त्याने अल्पसंख्यांकांच्या हिताच्या दृष्टीने पाऊले उचलावीत व प्रांतातील बहुसंख्यांकांच्या अव्यवस्थेवर नियंत्रण ठेवावे. एक भारतीय या नात्याने भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीबद्दल मला निश्चितच आस्था आहे व म्हणूनच केंद्रीय ( Unitary) शासन पद्धतीवर माझा प्रगाढ विश्वास आहे. या व्यवस्थेला विघटित करण्याचा विचारही मला अस्वस्थ करतो. ह्या एककेंद्रीय शासन पद्धतीत भारतीय राष्ट्र घडविण्याची फार मोठी सुप्त शक्ती आहे. एककेंद्रीय शासन पद्धतीमुळेच भारतात राष्ट्रवृती वाढीस लागली आहे परंतु ती अजून पूर्णावस्थेस पोहोचलेली नाही. म्हणूनच आजच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये ही एककेंद्री शासन पद्धती काढून घेणे मला अमान्य आहे. कारण भारत अजून पूर्णशः एकसंध राष्ट्र झालेले नाही.
तथापि, ज्या स्वरूपात प्रश्न समोर मांडलेला आहे त्याकडे पाहता हा केवळ पुस्तकी प्रश्न दिसतो. म्हणून जर प्रांत सरकारे मध्यवर्ती सरकारशी विसंगत राहणार नसतील तर संघ शासने पद्धतीवरही विचार करण्याची मी तयारी दाखवीन.
अध्यक्ष महोदय, दलितांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्यावतीने जे काय मला सांगावयाचे होते ते मी आपल्या पुढे मांडलेले आहे. आता एक भारतीय या नात्याने आम्हाला कोणत्या परिस्थितीशी तोंड द्याचे लागते, या दृष्टीने दोन शब्द बोलण्याची कृपया परवानगी द्याल अशी भी अपेक्षा करतो. राष्ट्रीय चळवळीचा मी जरी केवळ मूक प्रेक्षक नसलो तरीही आतापर्यंत त्या प्रश्नांवर जी गंभीर मते मांडण्यात आली त्याला मी आपली अधिक जोड देत नाही. आमची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आम्ही योग्य मार्गाने जात आहोत की नाही याबद्दल मी बराच चितातूर आहे. या उपायांचे स्वरुप काय असावे हे ठरविणे ब्रिटिश प्रतिनिधींच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. मी त्यांना इतकेच सांगू इच्छितो की या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सलोख्याचा मार्ग निवडायचा [कौ ] [दमन ] [तंत्राचा ] अवलंब करायचा हा निर्णय त्यांनी घ्यावा कारण निर्णय कोणताही [असला ] [तरी ] अंतिम जबाबदारी त्यांचीच राहणार आहे. तुमच्यापैकी बळाच्या वापरावर ज्यांचा विश्वास असेल त्यांना मी राजकीय तत्त्वज्ञानाच्या [एका ] [महान ] [शिक्षकाच्या-एडमंड ] बर्कच्या-एका चिरस्मरणीय विधानाची - आठवण करून देऊ इच्छितो.