डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २४२
अमेरिकेतील वसाहतीच्या समस्येवर विचार करीत असता ते इंग्लिश राष्ट्राला
उद्देशून म्हणाले,
त्यामुळे '' केवळ बळाचा वापर हा तात्पुरताच असतो. काही काळाकरिताच सत्ता गाजवता येईल. परंतु त्यामुळे पुन्हा त्यांना अधिपत्याखाली ठेवण्यासाठी बळाचा वापर करण्याच्या गरजेला कायमचे दूर करता येणार नाही. ज्या राष्ट्राला कायमचे अधिपत्याखाली ठेवावयाचे आहे त्यावर अशा पद्धतीने शासन करता येत नाही.
माझा दुसरा आक्षेप बळाच्या परिणामकारकतेच्या अनिश्चितेबाबत आहे. बळाच्या वापरातून नेहमीच दहशत निर्माण होईल असे नाही आणि सुसज्ज सैन्य म्हणजे विजय नव्हे. जर तुम्हाला यश मिळाले नाही तर मग कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. वाटाघाटी अपयशी ठरल्यावर फक्त बळाचा वापर उरतो. परंतु बळाचा वापरही अपयशी ठरला तर वाटाघाटीच्या आशाच उरत नाहीत. दयेच्या मोबदल्यात कधी-कधी सत्ता व अधिकार मिळविता येतात, परंतु शक्तिपात व पराभूत झालेल्या हिंसेला भीक म्हणून सत्ता व अधिकार कधीही मागता येत नाही. . . .
बळाच्या वापराला माझा पुढचा आक्षेप असा आहे की, प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुम्ही जे मिळवाल त्याला तुम्ही हानी पोचवाल. तुम्ही जे मिळविता ते त्याच्या मूळ स्वरुपात मिळत नसते, ते अवमूल्यन झालेले, रसातळास गेलेले, उजाड झालेले आणि नाश पावलेल्या स्वरुपात असते."
वरील उपदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष केले आणि महान अमेरिका खंड तुमच्या हातातून गेला. तुम्ही त्याची दखल घेतली तेव्हाच उर्वरित राज्ये तुमच्या हातात आहेत. आपल्यापैकी जे लोक सलोख्याच्या पक्षाचे आहेत त्यांना मी एक सल्ला देऊ इच्छितो. येथील प्रतिनिधींची अशी समजूत दिसते आहे की स्वसत्ताक राज्याच्या दर्जाबाबत होणारी ही बौद्धिक लढाई निर्णायक ठरुन त्यावरच अंतिम निर्णय अवलंबून राहील. परंतु इतक्या महत्त्वपूर्ण प्रश्नाला केवळ तार्किक सूत्रांमध्ये बांधण्याचा प्रयत्न करण्याइतकी अन्य मोठी चूक नसेल. तक- शास्त्राशी माझे काही वैर नाही, परंतु येथील विद्वानांनी आपली पूर्वानुमाने काळजीपूर्वक निवडावीत इतकेच माझे म्हणणे आहे, नाही तर अटळ अशा स्वरुपाची संकटे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा माझा त्यांना इशारा आहे. ज्याप्रमाणे डॉ. जान्सनने बर्कलेचे सर्व ' विरोधाभास ' पायदळी तुडवून टाकले त्याप्रमाणे तर्कदृष्ट्या हार झाल्यानंतरही तुम्ही हार मान्य करता की पुन्हा THE चालवून ते मत खोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहात हे सर्वस्वी तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे. कदाचित एक गोष्ट कोणीच नीट लक्षात घेतलेली