२०-११-१९३० ब्रिटिश सरकार जोपर्यंत या देशात आहे, आमच्या हातात राजकीय सत्ता येणे शक्य नाही - Page 285

ब्रिटिश सरकार . . . . . . सत्ता येणे शक्य नाही २४३ दिसत नाही ; ती म्हणजे, देशाची सध्याची मानसिकता व प्रवृत्ती अशी आहे की बहुसंख्य लोकांना स्वीकार्य नसलेली कोणतीही घटना येथे कामाची ठरणार नाही. तुम्ही निवडावे व आम्ही मान्य करावे ही वेळ आता कायमची गेली आहे. ती कधीही परत येणार नाही. म्हणूनच, घटना रूढ व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर नवीन घटना ठरविताना तिला तर्काच्या आधारापेक्षा लोकसंमतीच्या कसोटीवर पारखणेच योग्य ठरेल,

मूळ इंग्रजी भाषणाचा अनुवाद अतिथी संपादकांनी केला आहे.