२०-११-१९३० ब्रिटिश सरकार जोपर्यंत या देशात आहे, आमच्या हातात राजकीय सत्ता येणे शक्य नाही - Page 287

भारताचे संरक्षण .. . . . . संबंधित असावे २४५

महोदय, ही दुरूस्ती केवळ दलित वर्गांच्याच हिताची आहे असे नव्हे तर सर्वच जातींच्या व भारतीय प्रजेच्या कल्याणासाठी ही दुरूस्ती आहे असे मी नम्रतापूर्वक आपल्या निदर्शनास आणून देत आहे. देशातील कोणत्याही नोकऱ्यांवर. भारतातील एखाद्या जातीचा एकाधिकार प्रस्थापित करण्यास परवानगी देणे हा प्रजेच्या दृष्टीने मोठा धोका ठरणार आहे असे माझे स्पष्ट मत आहे. हा प्रजेच्या दृष्टीने मोठा धोका आहे असे जे मी म्हणतो त्याचे कारण म्हणजे त्या विशिष्ठ जातींच्या लोकांना वर्चस्व असलेल्या माऱ्याच्या जागांवर राहाण्याचा संरक्षणात्मक दर्जा दिल्या जातो त्यामुळे त्या जातींमध्ये केवळ श्रेष्ठत्वाची भावनाच निर्माण होते असे नव्हे तर लोकांच्या कल्याणकारी मार्गावर ते संकट ठरुन त्यांना या जातींवरच अवलंबून राहाण्यास भाग पाडल्या जाते. म्हणून मी निवेदन करीत आहे की, ज्याअर्थी, आपण भारतासाठी नवीन घटना निर्माण करीत आहोत तेव्हा भारतीय प्रजाजनापैकी प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुरूप देशातील कोणतीही सरकारी नोकरी करण्याची परवानगी मिळेल अशी पद्धती निर्माण करणे आपले कर्तव्य आहे आणि ही जी दुरूस्ती मी पुढे मांडतो ती केवळ समितीच्या अहवालात ग्रथित केलेल्या तत्त्वांचा तर्कशुद्ध परिणाममात्र आहे. कारण चौथ्या विभागाच्या पहिल्या उपविभागाचे आपण निरीक्षण केले तर तुम्हाला हेच दिसून येईल.

“ नव राज्ययंत्रणेतील भारतातील भावी सरकार, त्याचप्रमाणे भारताचे संरक्षण मुख्यतः वाढत्या प्रमाणात भारतीय लोकांशीच संबंधीत असावेत, ब्रिटिश सरकारशी नव्हे, असेच या' उपसमितीचे मत आहे. “

महोदय, या विधानाला जर काही अर्थ असेल तर भारताचे संरक्षण अधिकाधिक प्रमाणात भारतातील सर्व जनतेशी संबंधित असावे, केवळ एका विशिष्ट जातीपुरताच त्याचा संबंध असून ते मुळीच भागणार नाही.

म्हणूनच मी विचारार्थ पुढे मांडलेली घटना दुरूस्ती या परिषदेने मान्य करावी असे मी सुचवित आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणावर नंतर झालेल्या चर्चेत मि. थॉमस म्हणतात की उपसमितीने स्पष्टपणे भारतीयकरण ( Indianisation ) असा शब्दप्रयोग केल्यामुळे वेगळ्या दुरूस्तीची गरज नाही. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,

माझ्या म्हणण्याचा स्पष्ट अर्थ आहे की भारतीयकरण अशाच स्वरूपाचे असावे की ज्यात सर्व जातींच्या लोकांना नोकऱ्यांमध्ये शिरकाव करण्याची संधी असावी. आजही भारतीयकरणाला काही जातींचा एकाधिकार असाच अर्थ प्राप्त झाला आहे.

७ ७ ७

मूळ इंग्रजी भाषणाचा अनुवाद अतिथी संपादकांनी केला आहे.