२५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
गेला नाही अशी या राष्ट्रभक्ताला खात्रीने माहिती असते. पण त्याच्या न्याय- रक्षणार्थ आणि त्याला न्याय्यसंधी देण्याकरिता त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव होत नाही. मानवाला आणि समाजाला हानिकारक अशा शेकडो दुष्ट रूढिंची त्याला जाणीव असते, परंतु त्याला या उद्देग आणणाऱ्या गोष्टींचा वीट आलेला नसतो. या देशभक्ताची, त्याला व त्याच्या वर्गाकरिता अधिकार आणि अधिक अधिकार ही एकच आरोळी असते. मला आनंद होत आहे की मी अशा देशभक्तांच्या वर्गापैकी नाही. मी अशा वर्गातील आहे की जो स्वत: लोकशाहीचा पाठीराखा आहे आणि जो कोणत्याही आकारात आणि पद्धतीत असलेल्या एकाधिकारशाहीचा विध्वंसक आहे. आमचे ध्येय ' एक व्यक्ती एक मूल्य ' या आमच्या साध्याला जीवनाच्या सर्व क्षेत्रात-राजकीय, आर्थिक आणि सामाजिक-कृतिशीलरित्या आचरणात आणावयाचे आहे. या अत्युच्च मूल्यांशी दलित वर्गाची बांधिलकी आहे आणि म्हणून प्रातिनिधीक सरकार हे ध्येय साध्य करण्याचे एक माध्यम आहे. या मूल्यांच्याब्दल आम्हाला असलेल्या आदरबुद्धिच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना प्रत्यक्षात आकार देण्यास आवश्यक असा जाहीरनामा घोषित करावा असा मी आपणास आग्रह करीत आहे. दलित वर्गासंबंधी आपली पूर्ण सहानुभूती असल्याचे आपण कदाचित आश्वासन द्याल. माझे याला असे उत्तर आहे की, दुःखी लोकांना जर कशाची गरज असेल तर याहीपेक्षा काहीसे अधिक निश्चित स्वरुपाचे आणि अधिक तरतूद असलेले हवे आहे. मी अनाठायी भीती व्यक्त करतो आहे असा समज करुन घेऊन आपण माझ्यावर रोष व्यक्त कराल. परंतु सुरक्षिततेची खात्री असल्याची निश्चितता बाळगून आपला सर्वनाश ओढवून घेण्यापेक्षा त्या भीतीबाबत चितातूर राहिल्याने कोणी दुस्वास केला तरी ते अधिक चांगले हेच माझे त्याला उत्तर आहे.
मूळ इंग्रजी भाषणाचा अनुवाद अतिथी संपादकांनी केला आहे.