१९-१-१९३१ तऱ्हेवाईक देशभक्तांच्या वर्गापिकी मी एक नाही - Page 293

३८
स्वराज्यात अस्पृश्य जनतेला
समान हक्काने राहता आले पाहिजे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाहीर स्वागत व सन्मान करण्याचे मुंबई इलाख्यातील अस्पृश्य समाजातील लोकांनी ठरविले आणि तो स्वागताचा समारंभ रविवार, तारीख १ मार्च, १९३१ रोजी मुक्रर करण्यात आला. या जाहीर स्वागताच्या सभेला प्रवेश फी दाखल दोन आण्याचे तिकीट ठेवून या तिकीट विक्रीचे सर्व उत्पन्न नाशिक मंदीर प्रवेश सत्याग्रह फंडाला देण्याचे ठरविले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हितसंबंधाची केलेली अपूर्व कामगिरी ऐकण्यासाठी या जाहीर सभेला जवळ जवळ दहा हजार अस्पृश्य जनसमूह हजर होता. परळ दामोदर हॉलमागील भव्य पटांगण माणसांनी फुलून गेले होते. या जाहीर सभेचे अध्यक्षस्थान डॉ. पी. जी. सोळंकी यांनी स्वीकारले होते. सभेकरिता मुंबई इलाख्यातील निरनिराळ्या शहरातून, तालुक्यातून अस्पृश्यांचे प्रतिनिधी हजर होते. सायंकाळी सात वाजता सभेला सुरवात समाज समता संघाचे उपाध्यक्ष श्री. देवराव नाईक यांनी आपल्या स्वागतपर भाषणाने केली, त्यांनी डॉक्टरसाहेबांच्या विलायतेमधील कामगिरीविषयी उल्लेख करून सांगितले की, डॉक्टरसाहेब हे आपल्या कामगिरीने नुसते अस्पृश्य जनतेचेच पुढारी ठरत नसून त्यांना सामान्य जनतेचा व मुसलमान समाजाचाही भरपूर पाठिंबा आहे आणि भावी काळात ते बहुजन समाजाचे जिव्हाळ्याचे पुरस्कर्ते पुढारी ठरल्याशिवाय राहणार नाहीत. सामाजिक, धार्मिक, आर्थिक व रांजकीयदृष्ट्या त्यांच्याकडून उत्क्रांतीकारक सेवा घडल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. आणि तुम्हा सर्वातर्फे जनतेच्या या खऱ्या पुढाऱ्यांचे स्वागत करण्यात मला मोठी धन्यता वाटत आहे.

सभेचे अध्यक्ष डॉ. सोळंकी यांनी थोडक्यात स्वागताचे भाषण करून डॉ. आंबेडकर यांच्या भाषणास उत्सुक झालेल्या जनतेच्या आतुरतेकडे लक्ष देऊन डॉक्टर साहेबांना आपले भाषण करण्यास विनंती केल्यानंतर डॉ. आंबेडकर भाषणास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

आज जवळ जवळ पाच महिन्यांच्या अवधीनंतर आपणा सर्वाची भेट होण्याची

संधी प्राप्त झाली, त्याबद्दल मला अत्यानंद होत आहे. आपण सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवून सहकार्य करता, याबद्दल मला धन्यता वाटते पण तितकीच जोखीम

जनता : ९ मार्च १९३१.