सन्मानाच्या व नेटाच्या लढ्यातच आपल्या चळवळीचे यश २५७
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्फूर्तिदायक भाषणानंतर परिषदेत स्थानिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय स्वरूपाचे ठराव पास करण्यात आले. विशेषतः लंडन येथे भरलेल्या पहिल्या राऊंड टेबल परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रा. ब. श्रीनिवासन यांनी अस्पृश्य aah बजाविलेल्या अपूर्व कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. निरनिराळ्या ठरावावर श्री. शिवतरकर, हरिभाऊ रोकडे, गायकवाड, कांबळे, दारूळे, ओझरकर, फुलपगार, कोळोखे, विठ्ठल उपशाम, घोगरे, मधाळे, रणपिसे, थोरात, शिशुपाळ, आमोंडीकर, धोत्रे, ठोसर, चौरे, चंदनशिवे, गायकवाड, आडरेकर वगैरे मंडळींची भाषणे झाली.