४०
अस्पृश्यात भांडणे लावणाऱ्या
faria sma ओळखा
शुक्रवार ता. २९ मे १९३१ रोजी डिलाईल रोड, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची एक जाहीर सभा भरली होती. सभेत कमीतकमी ५ ते ६ हजारपर्यंत लोक जमले होते. चारशे पाचशे स्त्रीसमुदायही होता. निरनिराळ्या स्वयंसेवक पथकांकडून सभेच्या ठिकाणी योग्यप्रकारचा बंदोबस्त व शिस्त ठेवण्यात आली होती. याप्रसंगी डॉ. आंबेडकरांनी सरासरी एक तासपर्यंत भाषण केले. ते आपल्या भाषणात
म्हणाले,
आजच्या या सभेचा ठराविक असा काही कार्यक्रम अगर सभा भरविण्याला विशिष्ट काही कारण नसल्यामुळे येथे येण्याचे मी टाळणार होतो ; पण सभेच्या उत्साही चालकांनी अगदी पिच्छाच पुरविल्यामुळे येणे भाग पडले. आज विशेष काही .कारण नसल्यामुळे इतका लोकसमुदाय सभेला जमेल अशी माझी अपेक्षा नव्हती. मी आलो नसतो तर या पाच सहा हजार लोकांचा खरोखरच फार हिरमोड झाला असता. आपल्या लोकमताचा पारा किती जागृत व जिवंत आहे हे ओळखण्यास अशा सभा एकप्रकारे फार उपयोगी पडतात. सभेचा विषयही निश्चित नसल्यामुळे आज काय बोलावे या विचारातच मी होतो पण पुढाऱ्यांच्या एकी संबंधाचा जो ठराव या सभेने पुढे आणला आहे व त्यावर आतापर्यंत निरनिराळ्या वक्त्यांची जी भाषणे झाली आहेत त्यावरून आज याप्रसंगी कोणत्या विषयावर मी बोलणे समयोचित होईल याचा उलगडा मला
- झाला आहे. माझा विषय मला सापडला आहे. आपल्या अस्पृश्य समाजातील माझ्या टीकाकारांच्या टीकेला याप्रसंगी जाहीरपणे उत्तर देण्याचे मी ठरविले आहे. इतरवर्गीय लोकांच्या व पत्रकारांच्या टीकेचा उल्लेख या प्रसंगी मी करीत नाही. त्यांच्या टीकेचे स्वरुप, कारण व हेतू यांची आपल्यापैकी पुष्कळांना माहिती आहेच. त्यांच्या आक्षेपांचा समाचार वेळोवेळी मी घेतला आहे व कारण पडले व योगायोग आला म्हणजे पुढेही तो मला घ्यावा लागेल. आज फक्त अस्पृश्य समाजातील काही मंडळींकडून माझ्यावर जे आक्षेप घेण्यात येतात व जे आरोप करण्यात येतात ते किती फोल व निराधार आहेत हेच येथे आज मला सांगावयाचे आहे. माझ्यावर दोन प्रकारची टीका अस्पृश्यातील निरनिराळ्या
जनता : ८ जून १९३१.