२३-५-१९३१ सन्मानाच्या व नेट्टाच्या लढ्यातच आपल्या चळवळीचे यश - Page 301

अस्पृश्यात भांडणे लावणाऱ्या हितशत्रूंचा डाव ओळखा २५९

जातीकडून करण्यात येते. चांभारादी अस्पृश्य वर्गातील काही मंडळी म्हणते की, डॉ. आंबेडकर हे जातीने महार असल्यामुळे अस्पृश्य वर्गाला ज्या काही सवलती मिळतात त्या सवलतींचा व लाभांचा सारा मलिदा ते आपल्या महार जातीलाच चारू घालतात. चांभारांना वगैरे त्यातला काही वाटा ते मिळू देत नाहीत. हा आक्षेप इतका निराधार व खोटा आहे की, याच्याकडे लक्ष देणेही प्रथम मला प्रशस्त वाटेना. माझ्याशी मतभेद असणारे लोक इतर समाजात आहेत तसे ते चांभारादी अस्पृश्य समाजातही असू शकतील हे मी जाणतो. पण कोणत्याही सुविचारी, प्रामाणिक व जबाबदार चांभाराचा असल्या नीच व खोट्या आरोपाला पाठिंबा अगर संमती असेल असे मात्र मला मुळीच वाटले नव्हते. पण ' राष्ट्रीय ' पत्रातून चांभारांच्या सभेची जी रसभरीत पाने पाहण्यात आली त्यावरून चांभारातील भल्या समजण्यात येणाऱ्या काही पुढाऱ्यांच्या तोंडातून हे नीच आक्षेप निघाल्याचे मला समजले. राष्ट्रीय पत्रातील हे रिपोर्ट खरे असल्यास मला या चांभार मंडळीबद्दल खरोखरच फार खेद वाटतो. असले खोटे व निराधार आरोप माझ्यावर करून त्यांनी आपला इतका अधःपात करून घ्यावयाला नको होता. माझ्यावर टीकाच त्यांना करावयाची होती तर त्यांनी दुसरा एखादा निराळा मुद्दा अगर निमित्त शोधून काढावयाला पाहिजे होते. पण सवलतीचा मलिदा मी एकट्या महार जातीलाच चारतो व चांभारादिकांच्या तोंडाला नुसती पाने पुसतो हा माझ्यावरील आरोप इतका स्पष्टपणे खोटा व निराधार आहे की, त्याच्या खोटेपणाबद्दल मला अगदी सुलभपणे वाटेल त्याची सप्रमाण खात्री पटवून देता येईल.

ठाणे, पुणे, सोलापूर, सातारा वगैरे ज्या जिल्ह्यांशी माझा निकट परिचय व संबंध येतो असे जरी जिल्हे घेतले व तेथील म्युनिसीपालिटी, लोकल बोर्डस्‌ वगैरे स्थानिक संस्थानातून अस्पृश्यांच्या वतीने जाणाऱ्या प्रतिनिधींची जातवारी पाहिली तरी 'महाराला मलिदा चारण्याचा' हा आरोप किती फोल, खट्याळ व दुष्टपणाचा आहे याबद्दल कोणाचीही सहज खात्री पटविता येईल. ठाणे जिल्ह्यात, इतर: जिल्ह्यांप्रमाणे महार जात ही बहुसंख्यांक जात आहे. पण तिच्यात लायक लोक असूनही ठाणे म्युनिसीपालिटीत, लोकल [बोर्डात, ] [स्कूल ] [बोर्डात ] [जे ] [अस्पृश्य ] सभासद प्रतिनिधी म्हणून आहेत त्यात एकही [महार ] [जातीचा ] [प्रतिनिधी ] नाही. सर्व चांभार जातीचे प्रतिनिधी आहेत. सोलापूर जिल्ह्यातही हाच प्रकार आहे. तेथील म्युनिसीपल स्कूल बोर्डमध्ये व म्युन्तिसीपालिटीमध्ये [चांभार ] [व ] [ढोर ] समाजातीलच प्रतिनिधी आहेत. एकही महार नाही. आणि इतरांच्या मानाने महारांची संख्या अधिक आहे व [त्यांच्यात ] [जागृतीही ] [मोठी ] [झाली ] [आहे. ] पुणे म्युनिसीपालिटीतही दोन्ही प्रतिनिधी चांभार [जातीचे ] [आहेत. ] सातारा डिस्ट्रिक्ट बोर्डामध्ये सुद्धा एकही महार [जातीचा ] [प्रतिनिधी ] [नाही. ] धारवाड, विजापूर वगैरे कानडी मुलखातही हाच [प्रकार ] [आढळून ] [येईल. ] याप्रमाणे स्थानिक