२६२ डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तरी कसे घ्यावयाचे ? ज्यांना तत्त्वाची जाणीव नाही व ती करून घेण्याची इच्छा नाही आणि स्वाभिमानाची चाड नाही, फक्त स्वतःचे महत्त्व वाढविण्याची इच्छा आहे , त्यांच्याशी कोणी झाला तरी काय व कसे मिळते घेणार अगर त्याची समजूत पटवू शकणार ? अशा माणसांना आपल्यासारख्या सामान्य जनतेनेच ताळ्यावर आणले पाहिजे. खरा व लायक पुढारी कोण व आपले हित कोण साधू शकतो याचा निर्णय यापुढे जनतेने दिला पाहिजे व ' मला पुढारी म्हणा ' असे म्हटल्याने पुढारीपण येत नसते ही गोष्ट पुढारी होवू इच्छिणाऱ्यांनीही ओळखली पाहिजे.