२९-५-१९३१ अस्पृश्यात भांडणे लावणाऱ्या हितशत्रूंचा डाव ओळखा - Page 305

४१
खडतर परिस्थितीशी झगडूनच
समाजोन्नती शक्य

तारीख ३१ मे १९३१ मु. वडनेर, ता. चांदवड येथे झालेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्यातील युवकास पुढीलप्रमाणे संदेश दिला. ते म्हणाले,

नाशिक जिल्ह्यातील युवक संघाच्या आजपर्यंतच्या कार्याबद्दल मला समाधान वाटते. जिल्ह्यातील जागृतीचे कार्य मोठ्या हिंमतीने केले आहे. . प्रत्येक गावी खडतर परिस्थितीशी झगडून समाजोन्नतीच्या जलशाच्या द्वारे केलेले प्रयत्न फारच अपूर्व असे आहेत. गावोगाव निर्भय तरुणांचे संघ स्थापून, लाठी, व्यायामादिक शारीरिक खेळ शिकणे, वर्तमानपत्रे वाचून अज्ञानी लोकास परिस्थितीची ओळख करून देणे वगैरे प्रकारच्या कामगिरीला आणखी व्यापक असे स्वरुप द्या, म्हणजे आपल्या लढ्याला यश मिळविणे कठीण जाणार नाही.

जनता : ८ जून १९३१.