८-१०-१९३१ माझ्या लोकांच्या हितसंबंधाचा प्रतिनिधी मीच आहे - Page 315

४६
o देशाच्या ऐक्यासाठी संघटना आवश्यक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपली विलायतेमधील कामगिरी तात्पुरती संपवून परत येणार ही आनंदाची बातमी खालील पत्रकाद्वारे देण्यात आली.

शुक्रवार ता. २९ जानेवारी १९३२ रोजी सकाळी ६ वाजता (स्टॅ. टा.) बॅलार्ड पियर बंदरावर सर्वांनी हजर राहावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर स्वागत समारंभामध्ये ज्या ज्या व्यक्‍तींना-संस्थांना भाग घ्यावयाचा आहे त्यांनी ' डॉ. आंबेडकर स्वागत कमिटीकडे ' गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपली नावे नोंदवून पास घ्यावेत. नाव नोंदविण्याची फी, संस्था, मंडळे अगर पंच यांना प्रत्येकी पाच रुपये व स्वतंत्र व्यक्तीला प्रत्येकी एक रुपया पडेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोटीमधून उतरल्यानंतर सुमारे आठ वाजता बॅलार्ड पियर स्टेशनवरील हॉलमध्ये सर्वांच्या तर्फे स्वागत समारंभ साजरा करण्यात येईल. प्रत्येकानी आपापले हारतुरे यावेळी डॉक्टरसाहेबांना अर्पण करावेत.

दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत परळ येथील डाँक्टरसाहेबांच्या लायब्ररी हॉलमध्ये निरनिराळ्या प्रांतातून आलेल्या gerai विचारविनिमय होईल.

रात्रौ ७ ते १० वाजेपर्यंत राऊंड टेबल परिषदेसंबंधी डॉ. आंबेडकरांचे जाहीर भाषण होईल. याशिवाय इतर पुढाऱ्यांची भाषणे होतील.

शनिवारी ता. ३० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईतील प्रमुख पुढाऱ्यांबरोबर विचारविनिमय. नंतर दुपारी २-१५ च्या पंजाब मेलने राऊंड टेबल परिषदेच्या वकिंग कमिटीच्या कार्यासाठी दिल्लीला जातील.

स्वागत कमिटीच्या विनंतीप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीने स्वागत समारंभाचे पास विकत घेतले असतील त्यांचा स्वागत कमिटीत समावेश करण्यात येईल.

आपला नम्र,

सीताराम नामदेव शिवतरकर,

सेक्रेटरी, डॉ. आंबेडकर स्वागत कमिटी, मुंबई.

त्यानुसार अस्पृश्य समाज त्यांच्या जंगी स्वागताच्या तयारीतच होता. अखिल हिंदुस्थानातील अस्पृश्य बांधवांच्या भावी राज्यघटनेविषयी राऊंड टेबल

जनता: २३ आणि ३० जानेवारी १९३२.